शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या अंत्यविधीसाठी पैसे आकारणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 01:09 IST

पनवेलमधील धक्कादायक प्रकार : नातेवाइकांकडून नाराजी

पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीतील पोदी स्मशानभूमीत कोविडच्या मृतांवर अंत्यविधी केल्यानंतर २,५०० रुपयांची आकारणी केली असल्याचा आरोप येथील मृतांच्या नातेवाइकांकडून करण्यात आला आहे. जासई येथील ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा कोरोनामुळे १ आॅगस्ट रोजी मृत्यू झाल्यावर, त्यांच्यावर पोदी स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आले होते.

पनवेलमध्ये उपजिल्हा रुग्णालय व एमजीएम रुग्णालय ही दोन कोविड रुग्णालये आहेत. या ठिकाणी कोविडने मृत पावलेल्या मृतदेहांवर नवीन पनवेल येथील पोदी व पनवेलमधील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यविधी केले जातात. खासगी संस्थेच्या पुढाकाराने पोदी येथील गॅसवरील शवदाहिनी चालविली जात आहे. मात्र, कोविडच्या मृतदेहावरील अंत्यविधी करताना, त्यांच्या नातेवाइकांकडून पैशाची आकारणी करणे चुकीचे असल्याचे रूपेश भोईर यांचे म्हणणे आहे. अंत्यविधीच्या वेळी भावुक झालेले नातेवाईक पैशांबाबत विचारणा करीत नसले, तरी ही पद्धत चुकीची असल्याचे भोईर यांचे म्हणणे आहे.याबाबत पालिकेचे स्वच्छता निरीक्षक शैलेश गायकवाड यांना विचारणा केली असता; त्यांनी संबंधित शवदाहिनी खासगी संस्था चालवित आहे. ती शवदाहिनी कार्यान्वित करण्यासाठी लागणारा गॅस, मनुष्यबळ याकरिता ही संस्था निधी आकारात असते. पालिकेमार्फत ही पैशाची आकारणी केली जात नसल्याचे गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केले.शासनाने निधी द्यावाकोविडच्या मृतदेहावर अंत्यविधीसाठी लागणारा खर्च शासनाच्या आस्थापनांनी करण्याची आवश्यकता आहे. संबंधित स्मशानभूमी खासगी संस्थांमार्फत कार्यान्वित असल्या, तरी शासनामार्फत या संस्थांना निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.खासगी संस्थेचा प्रताप : पोदी आणि अमरधाम स्मशानभूमीत कोविडमुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार केले जातात, पण पोदीतील स्मशानभूमीचे काम खासगी संस्थेकडून होत असल्याने ते गॅस, मनुष्यबळासाठी पैसे आकारत आहेत.

टॅग्स :panvelपनवेलRaigadरायगड