शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 00:03 IST

अलिबाग-सुडकोली रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत.

- आविष्कार देसाई अलिबाग : तालुक्यातील अलिबाग-सुडकोली रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणचे रस्ते पहिल्याच पावसात वाहून गेले आहेत, त्यामुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असल्याने तब्बल २४ गावांतील सुमारे ३० हजार नागरिकांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागत असल्याने मेटाकुटीला आले आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीलाच रस्ते बनवण्याचे काम हाती घेतल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला पाऊस पडल्यानंतर काम बंद करावे लागले होते. सार्वजनिक विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे रस्त्याची विल्हेवाट लागल्याची नागरिकांची तक्रार आहे. तालुक्यातील ग्रामीण भागांना जोडणाऱ्या बहुतांश रस्त्यांची अशाच प्रकारे दुर्दशा झाल्याने बांधकाम विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.निधी उपलब्ध नसल्याची ओरड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सातत्याने करण्यात येते, त्यामुळे जिल्ह्यातील रस्ते सुस्थितीत करण्यात बांधकाम विभागाला अनेक अडचणी येतात. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नसणे, यंत्रसामग्री नसणे, अशी विविध कारणे त्यांच्याकडून देण्यात येतात, त्यामुळे नागरिकांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागतो. बांधकाम विभागाला निधी प्राप्त झालाच तर तो निधी खर्च करताना पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे या कालावधीत केलेले रस्ते टिकतील का याचा विचार केला जात नसल्याचे अलिबाग-सुडकोली या रस्त्याच्या कामाने दाखवून दिले आहे.अलिबाग-सुडकोली हा रस्ता अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे. येथूनच पुढे हा रस्ता रोहा तालुक्याला जोडण्याचे काम करतो. त्यामुळे या रस्त्याची स्थिती भक्कम आणि प्रवास करण्यायोग्य असलीच पाहिजे. मात्र, गेली काही वर्षे रस्त्यांची नुसतीच डागडुजी केली जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे रस्त्यांवर सातत्याने खड्डे पडत आहेत. खड्डे बुजवतानाही चिखल-मातीचा उपयोग केलाजात असल्याने पावसाच्या एका सरीमध्येच रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरते.अलिबाग-सुडकाली रस्त्याचे काम जून महिन्यात सुरू करण्यात आले. अलिबाग ते बामणगावपर्यंत रस्ता करण्यात आला. नंतर मात्र पावसाने हजेरी लावल्याने बांधकाम विभागाला काम थांबवावे लागले होते. रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने एकतर उशिरा सुरू केले होते. त्यामुळे जून महिन्यात कामाला सुरुवात केल्याने काम पूर्णच होणार नव्हते आणि झालेच असते तर पहिल्याच पावसात केलेले रस्ते आहे तशा अवस्थेतच राहिले असते, असे ग्रामस्थ सचिन भोईर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.पावसाला सुरुवात झाली की यांना रस्त्यांची कामे आठवतात. आताच्या पावसाच्या काही दिवसआधी रस्त्यांची कामे केली जातात, त्यामुळे पावसात रस्ते वाहून जातात. त्यानंतर पुन्हा कामे काढायची आणि कामासाठी येणारा निधी खर्च करून जनतेलाच भुर्दंड बसवायचा, असेच चित्र सध्या पाहायला मिळत असल्याचे ग्रामस्थ सिद्धेश भगत यांनी सांगितले.१५ मे नंतर डांबरीकरणाच्या रस्त्यांची कामे नियमानुसार करता येत नाहीत. येथे तर जून महिन्यातच कामाला कशी सुरुवात केली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.>अलिबाग-सुडकोली टप्प्यातील गावेअलिबाग-बामणगावपर्यंत रस्त्याचे काम झाले आहे. कुंठ्यांची गोठी, वढाव, वेलवली-खानाव, खानाव, उसर, घोटवडे, मल्याण, वावे, चिंचोटी, दिवी-पारंगी, फणसापूर, बाफळे, भोनंग, बोरघर, भिलजी, रामराज, उमटे, महानवाडी फाटा, नवघर, नांगरवाडी, तलवली, भागवाडी, नवखार आणि सुडकोली या गावांचा समावेश होतो.>अलिबाग-सुडकोली रस्त्यावर खड्डे पडले असून यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता आहे.>ग्रामीण भागातून अलिबागला कामासाठी रोजच यावे लागते. वर्षानुवर्षे रस्त्यांची हालत काही सुधारलेली दिसत नाही. खड्ड्यांतून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो, असे उमटे येथील रहिवासी आरती पुनकर यांनी सांगितले. दरम्यान, सार्वजनिक विभागाचे उपअभियंता मधुकर चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.