शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
6
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
7
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
8
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
9
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
10
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
11
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
12
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
13
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
14
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
15
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
16
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
17
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
18
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
19
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
20
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!

‘सीईटीपी’ आयएमएस मानांकन

By admin | Updated: February 20, 2016 02:06 IST

महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यातून बाहेर सोडण्यात येणाऱ्या रसायनमिश्रित सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या सामाजिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला गुणवत्ता, पर्यावरण व सुरक्षा नियोजन

महाड : महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यातून बाहेर सोडण्यात येणाऱ्या रसायनमिश्रित सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या सामाजिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला गुणवत्ता, पर्यावरण व सुरक्षा नियोजन प्रणालीसाठी आयएमएस आंतरराष्ट्रीय मानांकन जाहीर झाल्याची माहिती एमएमए सीईटीपीचे अध्यक्ष एस. बी. पठारे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानांकन मिळवणारा भारतातील दुसरा तर महाराष्ट्रातील पहिला सामाजिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प ठरल्याचा दावा पठारे यांनी यावेळी केला. गुजरात राज्यातील वटवा येथील ग्रीन एन्व्हॉरमेंट या सामाजिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला यापूर्वी हे मानांकन प्रमाणपत्र मिळाले होते, अशी माहितीही पठारे यांनी दिली. छत्तीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या महाड औद्योगिक वसाहतीमध्ये ९० टक्के रसायनिक कारखाने असून सुमारे दीडशे लहान मोठे कारखाने सध्या सुरु आहेत. रासायनिक कारखान्यामुळे या परिसरात प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली होती. औद्योगिकीकरणामुळे या तालुक्याची प्रगती होत असतानाच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व प्रदूषणावर मात करण्यासाठी २००३ मध्ये उत्पादक संघटनेने सामाजिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची सहकारी संस्था (एमएमए सीईटीपी) स्थापन केली. मात्र त्याची प्रत्यक्ष प्रक्रिया २००५ मध्ये कार्यान्वित झाली. गेल्या ११ वर्षाच्या कार्यकाळात सीईटीपीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. प्रत्येक कारखान्यात दूषित पाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प असले तरी ते पूर्ण क्षमतेने चालवले जात नव्हते. त्यामुळे सीईटीपीत येणाऱ्या दूषित पाण्याचा सीओडी प्रमाणाबाहेर जास्त होता. त्यामुळे कारखान्यांचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कटेकोरपणे चालण्यासाठी सीईटीपीतर्फे मार्गदर्शन केले गेले. मात्र असे असतानाही काही कारखाने जाणीवपूर्वक गैरमार्गाने प्रमाणाबाहेर सीओडीचे प्रदूषित पाणी सीईटीपीत सोडत असल्याने सीईटीपीचा परफॉर्मन्स खराब होत असे. आॅक्टोबर २०१४ मध्ये प्रदूषणावर शंभर टक्के मात करण्यासाठी व प्रदूषण मंडळाचे मानांकन राखण्यासाठी प्रत्येक कारखान्यात ईटीपीचे स्टेजवाईज सॅम्प्लिंग घेण्याचा कठोर निर्णय सीईटीपीने घेतला.गेल्या वर्षभरापासून उचललेल्या कठोर पावलांमुळे प्रदूषण मंडळाच्या मानांकनानुसार रिझल्ट येवू लागले. जून १५ पासून प्रत्येक ३० मिनिटाला आॅनलाइन मॉनिटरिंग मशिनच्या सहाय्याने रिडिंग रेकॉर्डिंग हटवून ते थेट प्रदूषण मंडळाच्या मुंबई व केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या दिल्ली कार्यालयातही प्रदर्शित होवू लागले. अशा प्रकारची अद्ययावत यंत्रणा बसवणारा महाराष्ट्रातील महाडचा पहिला सीईटीपी प्रकल्प ठरला अशी माहिती पठारे यांनी यावेळी दिली.