शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वे पुरवणार प्रवाशांना उन्हाळी हंगामात स्वस्त दरात जेवण; १०० हून अधिक स्थानकांवर सोय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 18:50 IST

खिशासाठी अनुकूल रू. २०/- किंमतीचे हे जेवण प्रवास करताना प्रवाशांसाठी समाधानकारक आणि किफायतशीर पर्याय प्रदान करणारा आहे.

मधुकर ठाकूरउरण: मध्य रेल्वे, भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या  सहकार्याने प्रवाशांना अनारक्षित डब्यांमध्ये  स्वस्त दरात अन्न आणि नाश्ता उपलब्ध करून देण्यासाठी एक नवीन उपक्रम घेऊन आली आहे. उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये प्रवासांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने अनारक्षित डब्यांमध्ये (जनरल क्लास कोच) प्रवास करणाऱ्या लोकांसमोरील आव्हाने ओळखून परवडणारे अन्न पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

खिशासाठी अनुकूल रू. २०/- किंमतीचे हे जेवण प्रवास करताना प्रवाशांसाठी समाधानकारक आणि किफायतशीर पर्याय प्रदान करणारा आहे. ज्यांना हलका नाश्ता हवा आहे त्यांच्यासाठी रू. ५०/- चे न्याहारी जेवण देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सुलभ प्रवास सुनिश्चित करण्यासाठी हे जेवण आणि पाणी प्लॅटफॉर्मवरील अनारक्षित डब्यांच्या (सामान्य श्रेणीचे डबे) जवळ असलेल्या काउंटरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या काउंटरवरून प्रवासी त्यांचा नाश्ता थेट खरेदी करू शकतात. त्यामुळे विक्रेत्यांना शोधण्याची किंवा स्टेशनच्या बाहेर जाण्याची गरज भासणार नाही.

मध्य रेल्वेवर हे फूड काउंटर खालील स्थानकांवर उपलब्ध आहेत - मुंबई विभाग - इगतपुरी आणि कर्जतभुसावळ विभाग - मनमाड, खंडवा, बडनेरा आणि शेगावपुणे विभाग - पुणे, मिरज, दौंड आणि साईनगर शिर्डीनागपूर विभाग - नागपूर आणि वर्धासोलापूर विभाग - सोलापूर, वाडी आणि कुर्डुवाडी

गेल्या वर्षी सुमारे ५१ स्थानकांवर या सेवेची यशस्वी चाचणी घेण्यात आली. चाचणीतील यशाच्या आधारावर रेल्वेने कार्यक्रमाचा लक्षणीय विस्तार केला आहे. आता १०० हून अधिक स्थानकांवर आणि एकूण १५० काउंटरवर कार्यरत आहेत. भविष्यात आणखी स्थानकांचा समावेश करून या उपक्रमाचा आणखी विस्तार करण्याची योजना आहे.अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे.

टॅग्स :Raigadरायगडcentral railwayमध्य रेल्वे