शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
2
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
3
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
4
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
5
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
6
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
7
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
8
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
9
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
10
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
11
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
12
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
13
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
14
Bigg Boss 19: क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीवर संतापला सलमान खान, सारेच झाले अवाक्, कारण काय? 
15
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
16
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
17
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
18
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
19
सोमवती अमावस्या आणि लक्ष्मी पूजनाचा दुर्मिळ योग; 'या' ७ राशींच्या आयुष्याला मिळणार कलाटणी
20
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."

झूम अ‍ॅपवरून केला हनुमान जन्मोत्सव साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 06:13 IST

कराडे खुर्द येथील तरूणांची शक्कल : आधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्रामस्थ आले एकत्र

मयूर तांबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवीन पनवेल : सध्या सर्वत्र कोरोना विषाणुने धूमाकूळ घातलेला दिसून येत आहे. त्यामुळे सारेच नागरिक भयभीत झालेले आहेत. ८ एप्रिल रोजीचा हनुमान जयंतीचा सोहळा देखील सगळीकडे रद्द करण्यात आला. अशा परिस्थितीत देखील एकमेकांशी संपर्क साधून झूम या अ‍ॅप वरून रायगड जिल्ह्यातील पनवेलपासून साधारण १५ किलोमीटर दूर पाताळगंगा नदीकाठी वसलेल्या कराडे खुर्द, या गावी अनोख्या पद्धतीने हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावर्षी पहिल्यांदाच अशा प्रकारे हा उत्सव साजरा केला असल्याचे आशिष वैद्य यांनी सांगितले.पनवेल तालुक्यातील गावगावात मोठ्या उत्साहात हनुमान जयंती दरवर्षी साजरी केली जाते. मंदिराला विद्युत रोषणाई करून गावाला जेवण दिले जाते. यावेळी पालखीला सारे नागरिक एकत्र येतात. मात्र या वर्षी कोरोना विषाणुच्या प्रादुभार्वामुळे सारे सण, उत्सव रद्द करण्यात आले आहेत. कोरोनामुळे कराडे खुर्द गावातील देखील संपूर्ण उत्सवच रद्द करण्याचा योग्य निर्णय घेण्यात आला.या उत्सवाला गेल्या १३५ वर्षांची अखंड परंपरा आहे. प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी दोन महिने आधी ग्रामस्थांची या हनुमान जन्मोत्त्सवाच्या आयोजनासंदर्भात गांवात सभा घेतली होती. त्यानंतर महिन्याभरातच कोरोनाच्या संकटामुळे भारत हदरला. या विषाणूने जगभर पसरायला सुरूवात केली होती. या पाश्वभूमीवर १५ मार्च रोजी कराडे खुर्द येथील ग्रामस्थांनी गावात एक सभा घेऊन संपूर्ण उत्सवच रद्द करण्याचा निर्णय घेतला.कराडे खुर्द येथील परंतु इतर गावात आणि मुंबई, ठाणे, पुणे अशा विविध ठिकाणी कामानिमित्त वास्तव्याला असलेल्या तरूण ग्रामस्थांनी एकमेकांशी संपर्क साधून झूम अ‍ॅपवरून हा उत्सव व्हर्च्युअल पध्दतीने साजरा करण्याचं ठरवलं. त्यासाठी एक ग्रुप बनवला आणि या अ‍ॅपच्या माध्यमातून मिटिंग साधून जो जिथं आहे त्यांनी तिथंच राहून या उत्सवात उत्साहानं सहभाग नोंदवला होता.असा झाला सोहोळाच्८ मार्च रोजी सकाळी ६ ते ७ या कालावधीत कीर्तन तर ७.३० ते ८.३० या दरम्यान आरती आणि भजन अशा कार्यक्रमाचा सर्वांनी आनंद घेतला.च्प्रत्यक्ष एकत्र न जमताही एकोप्याचा आनंद घेत आपलं ध्येय साध्य करता येतं हेकराडे खुर्द येथील ग्रामस्थांनी आपल्या या उपक्रमातून दाखवून देत सर्वासमोर एक आदर्शठेवला आहे.