शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

महामार्गावर १६ ठिकाणी सीसीटीव्ही, गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 01:32 IST

या मार्गावर महत्त्वाच्या अशा १६ ठिकाणांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत तर २५ पोलीस अधिकारी व सुमारे २१७ पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्तही लावण्यात आला आहे.

निखिल म्हात्रेअलिबाग : गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने सध्या चाकरमानी कोकणात जाण्यास सुरुवात झाली आहे. गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी रायगड पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, या मार्गावर महत्त्वाच्या अशा १६ ठिकाणांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत तर २५ पोलीस अधिकारी व सुमारे २१७ पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्तही लावण्यात आला आहे.गणेशोत्सव हा कोकणवासीयांचा महत्त्वाचा सण मानला जातो. यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथून अनेक चाकरमानी हे कोकणातील आपल्या घरी जात असतात. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर होणारी वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सुमारे १४५ किलोमीटरच्या मार्गावर २१७ पोलीस कर्मचारी आणि २५ अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. तर, रायगड जिल्ह्यातील या मार्गावरील १६ ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले असून यामुळे वाहतूक नियंत्रणासाठी मदत होणार आहे. तर मुंबई-गोवा हायवेवरील रहदारीची महत्त्वाची ठिकाणे असलेल्या खारपाडा, हमरापूर, पेण, वडखळसमवेत महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस चौक्यांसह, अ‍ॅम्ब्युलन्स आणि क्रेनचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे.मुंबईसह इतर ठिकाणांहून प्रवास करणाºया गणेशभक्तांचा प्रवास सुखकर करण्यासाठी तसेच महत्त्वाच्या बाजारपेठांवर नजर ठेवण्यासाठी पोलीस विभागामार्फत पेण तालुक्यातील पेण - खोपोली बायपास ४, रामवाडी चौकी ३, वडखळ ३ असे पेण तालुक्यात१०, माणगाव तालुक्यातील इंदापूर स्टॅण्डवर १, महाड शहरातील नातेखिंड मदत केंद्रात ३, विसावा हॉटेल परिसरात १ तर पाली येथे ४ अशा एकूण १६ ठिकाणी हे सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.>रायगडमधील नियोजनसीसीटीव्ही १६पोलीस उपविभागीय अधिकारी 0६पोलीस निरीक्षक 0६साहाय्यक पोलीस निरीक्षक/साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक १३वाहतूक पोलीस कर्मचारी,पोलीस कर्मचारी २१७मदत केंद्रे 0९वॉकीटॉकी २०क्रेन 0९रु ग्णवाहिका 0९>रायगड जिल्ह्यात २८७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. १ लाख २३९ खाजगी गणपती आहेत तर १३ हजार ३७२ ठिकाणी गौरी स्थापना होते. या काळात होम गार्ड्स व राज्य राखीव दलाची मदत घेतली जाणार आहे.