शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट गुरे, भटक्या कुत्र्यांमुळे माणगावमध्ये नागरिक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 23:24 IST

म्हसळा नगरपंचायत हद्दीत मोकाट गुरे व भटक्या कुत्र्यांच्या दशहतीमुळे नागरिकांना हैराण केले आहे.

म्हसळा : म्हसळा नगरपंचायत हद्दीत मोकाट गुरे व भटक्या कुत्र्यांच्या दशहतीमुळे नागरिकांना हैराण केले आहे. मागील १५ ते २० दिवसांत शहरात श्वानदंशाच्या १० ते १५ घटना घडल्या आहेत. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात व माणगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

कुत्र्यांप्रमाणेच शहरातील रस्त्यांवर मोकाट गुरांमुळे पादचारी, ज्येष्ठ नागरिक, पदपथावरील व्यावसायिक, भाजी व फळविक्रेते, वाहतूकदारांना त्रासाचे होत आहे. शहरांत मोकाट गुरांचे प्रमाण वाढत असताना नगरपंचायत प्रशासन काय करीत आहेत, असे प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहेत.

मोकाट गुरे व भटक्या कुत्र्यांमुळे म्हसळावासी हैराण झाले आहेत. गुरांवर मालकांचे व नगरपंचायतीचे नियंत्रण नसल्याने वाहतूककोंडीची समस्याही बळावत आहे. पहाटे अथवा रात्री उशिरा येणारे पादचारी, दुचाकीवाहनांच्या मागे कुत्रे लागत असल्याचे त्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही.

नगरपंचायतीकडून कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात यावे, तसेच मोकाट गुरांची योग्य व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात यत आहे. परिसरात गेल्या काही दिवसांत श्वानदंशाच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे लहान मुलांना खेळताना, तसेच ज्येष्ठ नागरिक भययुक्त वातावरणात फिरताना दिसतात.अनेक वेळा शहरांत मोकाट गुरामुळे शहरात वाहतूककोंडीची समस्या उद्भवते. याशिवाय अपघातचे प्रसंगही ओढावले आहेत. अखेर वाहतूक पोलिसांना गुरे हाकलावी लागतात. गुरे नियंत्रण हा विषय प्राधान्याने नगरपंचायतीचा असल्याचे वाहतूक पोलिसांनी या वेळी सांगितले.

दोन वर्षांपूर्वी मासिक सभेत मोकाट गुरांच्या विषयी चर्चा झाली होती. सर्व अधिकार सीईओ, नगरपंचायत यांना देण्यात आले आहेत. त्यांच्याकडून याबाबत योग्य उपाययोजना अपेक्षित आहेत.- नासीर दळवी, माजी उपमहापौर, म्हसळा.

मोकाट गुरे व कुत्रे हा म्हसळ्यातील प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त असून दहशतीत वावरत आहेत. मासिक सभेपुढे हा प्रश्न घेण्यात येणार आहे.- दीपाली मुंडये, प्रशासकीय अधिकारी, नगरपंचायत, म्हसळा

मोकाट गुरे खासगी किंवा सार्वजनिक मालमत्तेच्या जागी अतिक्रमण, नासाडी करीत असल्यास त्यांना कोंडवाड्यांत घालणे, ही जबाबदारी नगरपालिका अधिकारी किंवा मुख्य अधिकाऱ्यांची आहे.- जहूर हुर्जुक, सामाजिक कार्यकर्ते, म्हसळा

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीRaigadरायगड