शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘जेएनपीए’तील मालवाहू जहाजांना मिळणार सौरऊर्जा; देशातील पहिलाच पायलट प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 07:24 IST

१०० कोटींचा असणार प्रकल्प, प्रदूषण कमी होऊन इंधनाचा खर्च वाचणार

मधुकर ठाकूर , लोकमत न्यूज नेटवर्क, उरण : जेएनपीए बंदरात उभ्या असलेल्या जहाजांना सौर ऊर्जा देण्यासाठी व पेट्रोल, डिझेलचा वाढता वापर दूर करण्यासाठी बंदर प्राधिकरणाने बंदरावरील किनारपट्टीवर विद्युतपुरवठ्यासाठी सौरऊर्जेवर चालणारा पायलट प्रकल्प राबविण्याची तयारी सुरू केली आहे. देशातील बंदरातील हा पहिलाच पायलट प्रकल्प ठरणार असून, तो उभारण्यासाठी जेएनपीए १०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. 

या पायलट प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर इंधनाची बचत, वायूप्रदूषण कमी करण्यात मोठी मदत होणार आहे. तूर्तास एपीएम टर्मिनल्स आणि कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यातील हा संयुक्त उपक्रम असल्याची माहिती जेएनपीए अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी दिली आहे.

जेएनपीए बंदरात अद्ययावत अशी सहा खासगी बंदरे आहेत. या सहा बंदरांमध्ये १२ ते १५ हजार कंटेनर वाहतूक क्षमतेची एकाचवेळी ३० मालवाहू जहाजे लागण्याची क्षमता आहे. कंटेनर मालाची चढउतार करण्यासाठी बंदरात तासनतास ही जहाजे बर्थवर उभी ठेवली जातात. यादरम्यान बर्थवर असताना, जहाजातील हॉटेलिंग, अनलोडिंग आणि लोडिंग यासारख्या अत्यावश्यक सेवा चालवण्यासाठी जहाजे  काही बेस लोड विजेचा वापर करतात. यासाठी विजेची आवश्यकता असते.

प्रदूषण कमी होऊन इंधनाचा खर्च वाचणार

  • जहाजाच्या क्षमतेनुसार १००० ते २५००० केव्हीए इतक्या प्रचंड क्षमतेच्या एचटी, एलटी दोन-तीन विद्युत जनित्रांचा वापर केला जातो. मालाची चढउतार करण्यासाठी २४ ते ४८ किंवा कधीकधी त्याहूनही अधिक तास लागतात. 
  • यादरम्यानच्या काळात विद्युत जनित्रांना सहा ते नऊ टन लिटर्स  डिझेल (६००० ते ९००० हजार लिटर्स) लागते. या दोन दिवसांसाठी पावणेसहा ते पावणेनऊ लाख रुपये खर्ची पडतात. जनित्रांवर मोठ्या प्रमाणावर इंधनाचा वापर होतो. यामुळे जनित्रांतून निघणाऱ्या धुरामुळे प्रदूषण वाढते. 
  • विजेसाठी इंधनावरही खर्च होत आहे. यावर उपाय म्हणूनच बंदरातील किनारपट्टीवरील जहाजांसाठी ही पायलट योजना राबविण्याचा पर्याय पुढे आल्याची माहिती जेएनपीएचे एम ॲंड ईई विभागाचे मुख्य व्यवस्थापक नितीन बोरवणकर यांनी दिली.

जेएनपीए बंदरात बर्थवर उभ्या असलेल्या जहाजांना किनाऱ्यावरील ऊर्जा पुरवण्यासाठी १०० कोटी खर्चाचा देशात कार्यान्वित होणारा हा पहिलाच प्रकल्प आहे. साधारणत: दीड वर्षात तो कार्यान्वित होईल. बंदरावरील जहाजावरील विद्युत पुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जनित्रांवर मोठ्या प्रमाणावर होणारा डिझेलचा वापर आणि वायुप्रदूषण कमी करण्यासाठी त्याची मदत होणार आहे. बंदरातील सर्वच टर्मिनल्सवर ही सुविधा वाढवली, तर राष्ट्रीय ग्रीडपासून बंदरात येणाऱ्या सर्वच जहाजांना किनाऱ्यावरील वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे. यासाठी एकूण ७४ मेगावॅट वीज आवश्यक आहे. - उन्मेष वाघ, अध्यक्ष-जेएनपीए

टॅग्स :JNPTजेएनपीटी