शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात प्रचार शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 23:05 IST

उमेदवारांच्या पायाला लागली भिंगरी : प्रचारातील शेवटच्या रविवारी मतदार भेटीवर दिला जोर

- आविष्कार देसाईअलिबाग : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता फक्त आठ दिवस उरले आहेत, तर प्रचाराला फक्त सहा दिवसांचा अवधी शिल्लक आहे. आज प्रचारातील शेवटचा रविवार असल्याने जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारांचा चांगलाच धुरळा उडवला आहे. प्रमुख नेत्यांच्या सभांबरोबरच कॉर्नर सभा, मतदारांच्या गाठीभेटी, गावबैठका यावर प्रामुख्याने उमेदवारांसह त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चांगलेच रान पेटवले आहे. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत पायाला भिंगरी लावल्यासारखे उमेदवार आपापला मतदारसंघ पालथा घालत आहेत. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असल्याचे दिसते.

सात विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने आघाडी विरोधात युती अशीच लढत पाहावयास मिळत आहे. अपवाद फक्त उरण, अलिबाग आणि श्रीवर्धन मतदारसंघाचा आहे. उरणमध्ये शिवसेनेचे मनोहर भोईर यांच्या विरोधात भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी यांनी आव्हान उभे केले आहे. तर अलिबागमध्ये काँग्रेसच्या उमेदवार अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर यांच्या विरोधात त्यांचे दीर राजेंद्र ठाकूर यांनी बंडखोरी केली आहे, तसेच श्रीवर्धन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांना काँग्रेसचे ज्ञानदेव पवार, दानेश लांबे, मोईझ शेख यांनी आव्हान दिले आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या युतीत फूट पडली आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत बिघाडी झाली आहे. प्र ितस्पर्धी वाढल्याने या उमेदवारांना विरोधकांबरोबर लढताना आपल्याच स्वकीयांचेही व्यवस्थापन करावे लागणार असल्याने त्यांची क्रयशक्ती अधिक खर्च होत असल्याचे दिसून येते.विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने आता रंगत चढू लागली आहे.

प्रचंड उन्हातपायपीटच्सकाळी ७ वाजल्यापासून उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे पायाला भिंगरी लावल्यासारखे संपूर्ण मतदारसंघात मतदारांच्या भेटी घेत होते.च्प्रचंड उन्हाचा तडाखा असतानासुद्धा त्यांनी पायपीट केली.च्वेळ कमी असल्याने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवार करत असल्याचे चित्र आहे.स्थानिक पातळीवरील नेत्यांवर धुरा१नवी मुंबईमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे १६ आॅक्टोबर रोजी येणार आहेत. काहीच दिवसांपूर्वी पेण येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा पार पडली होती.२राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. हे दिग्गज नेते सोडले तर विविध राजकीय पक्षांचे स्थानिक पातळीवरील नेते प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.३१९ आॅक्टोबरला प्रचाराच्या तोफा थंड होणार असल्याने प्रचारातील आजचा शेवटचा रविवार असल्याने सर्वच राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी मतदारांना सुट्टीच्या दिवशी गाठण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यांची भेट घेऊन निवडून देण्यासाठी आम्हालाच मत द्या, अशी विनंती मतदारांना केली.

टॅग्स :raigad-pcरायगड