शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीएतून एप्रिल २०२५ पर्यंत एक कोटीहून अधिक कंटेनर मालाची हाताळणी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 19:43 IST

वाढवणं बंदराच्या विकासासाठी ४० हजार कोटींच्या गुंतवणूकीच्या करारावर स्वाक्षऱ्या 

मधुकर ठाकूर 

उरण : येत्या एप्रिल २०२५ पर्यत भारत मुंबई कंटेनर टर्मिनल या जेएनपीए अंतर्गत असलेल्या चौथ्या खासगी बंदराच्या पुर्णत्वानंतर वार्षिक कंटेनर मालाच्या हाताळणीची क्षमता एक कोटी चार लाखांपर्यंत पोहचणार आहे.त्यामुळे जेएनपीएचे भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणून त्याचे स्थान मजबूत होईल असा विश्वास जेएनपीएचे प्रभारी अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी ३५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने व्यक्त केला आहे.यावेळी वाढवण येथील ग्रीनफील्ड बंदराच्या विकासासाठी जेएनपीएने सिंगापूर पोर्ट, सीएमएसीजीएम यांच्याबरोबर ४० हजार कोटींच्या दोन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या. 

देशातील सर्वात मोठे आणि युवा पोर्ट म्हणून ओळखला जाणाऱ्या जेएनपीएने ३५ वर्षात पदार्पण केले आहे.३५ व्या वर्धापनाचे औचित्य साधत जेएनपीएने महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी राज्याचे बंदरे, वाहतूक विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, मुंबई बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा, जेएनपीए बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेष वाघ, विविध शिपिंग लाईन्स, भागीदार आदी उपस्थित होते.

जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी हे भारतातील पहिले १०० टक्के जमीनदार आणि प्रमुख कंटेनर पोर्ट बनले आहे.३५ वर्षांच्या कारकिर्दीतील बंदराच्या प्रगतीचा आलेख आणि "समृद्धी बंदर" या थीमवर आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात राज्यपाल रमेश बैस यांनी प्रशंसा केली. यावेळी जेएनपीएच्या मागील ३५ वर्षातील प्रगती,विकास, वाटचालीचा जेएनपीए बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी आढावा सादर केला. जनेपीएने गेल्या काही वर्षांत सातत्याने दरवर्षी सहा दशलक्ष टीईयुस कंटेनरर्सची हाताळणी करीत आहे. त्याचबरोबर डिजिटलायझेशन, ऑटोमेशन, वचनबद्धता आणि ग्रीन पोर्ट उपक्रमांमध्ये बंदराच्या धोरणात्मक पुढाकाराने उद्योगात नवीन बेंचमार्क स्थापित केले असल्याचेही वाघ यांनी सांगितले.

एप्रिल २०२५ पर्यत भारत मुंबई कंटेनर टर्मिनल या जेएनपीए अंतर्गत असलेल्या चौथ्या खासगी बंदराची वार्षिक कंटेनर मालाच्या हाताळणीची क्षमता एक कोटी चार लाखांपर्यंत पोहचणार आहे.त्यामुळे जेएनपीएचे भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणून त्याचे स्थान मजबूत होईल असा विश्वास जेएनपीएचे प्रभारी अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी ३५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने व्यक्त केला आहे.यावेळी वाढवण येथील ग्रीनफील्ड बंदराच्या विकासासाठी जेएनपीएने सिंगापूर पोर्ट, सीएमएसीजीएम यांच्याबरोबर ४० हजार कोटींच्या दोन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्याही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जेएनपीए येत्या दोन महिन्यात ३८ एकलव्य मॉडेल शाळा सुसज्ज करण्यासाठी साडेतीन कोटी खर्चून एक हजार संगणक आणि १०० टॅब्लेट देणार असल्याची ग्वाही वाघ यांनी दिली. यावेळी बंदराच्या यशात दिलेल्या मौलिक योगदानाची दखल घेऊन पंचवीस जेएनपीए भागधारक आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आला.

टॅग्स :Raigadरायगडuran-acउरण