शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बल्प फार्मा पार्क हा प्रकल्प रासायनिक नाही, सुनील तटकरे यांची पत्रकार परिषदेत माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 06:55 IST

Sunil Tatkare : अलिबाग येथे राष्ट्रवादी काँग्रेस भवनात खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी रोहा मुरुड प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

अलिबाग: रोहा, मुरुड येथे येत असलेला बल्प फार्मा पार्क हा प्रकल्प रासायनिक नाही. मी आतापर्यंत कधीच दुट्टपी भूमिका घेतलेली नाही. शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे. त्यांना प्रकल्पाबाबत माहिती दिली जाणार असून, त्याचा विरोध असेल तर आम्ही शेतकऱ्यांसोबत राहणार. खासदार म्हणून रोजगार निर्मिती करणे हे माझे कर्तव्य आहे. त्यादृष्टीने केंद्रीय रसायन मंत्री सदानंद गौडा यांची भेट घेतली असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.अलिबाग येथे राष्ट्रवादी काँग्रेस भवनात खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी रोहा मुरुड प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. पेण, अलिबाग रेल्वे, उरण कोळीवाडा, जेएनपीटी प्रश्न, आरसीएफ प्रश्न,  मुंबई - गोवा महामार्ग, सागरी महामार्ग, जेट्टी प्रकल्प याबाबत केंद्रीय मंत्र्यांना भेटून जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने हे प्रश्न सोडविण्याबाबत आपली भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.

भाजप जिल्हाध्यक्षांच्या आरोपांना उत्तरभाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष ॲड. महेश मोहिते यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर रासायनिक प्रकल्पाबाबत दुट्टपी भूमिका घेत असल्याचा आरोप केला होता. याबाबत खासदार सुनील तटकरे यांनी उत्तर दिले आहे. रोहा मुरुड येथे येत असलेला फार्मा पार्क हा रासायनिक नाही. मी कधीही दुट्टपी भूमिका घेतलेली नाही. शेतकऱ्यांना या प्रकल्पाबाबत काही जण चुकीची माहिती देत आहेत. शेतकऱ्यांना प्रकल्प नको असेल तर आम्ही शेतकाऱ्यांसोबत आहोत, अशी स्पष्ट भूमिका खासदार सुनील तटकरे यांनी मांडली आहे.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरे