शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
6
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
7
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
8
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
9
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
10
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
11
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
12
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
13
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
14
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
15
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
16
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
17
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
18
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
19
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
20
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."

आरोग्य केंद्राची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 23:59 IST

महाड तालुक्यातील वरंध येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत मंजूर झाल्यानंतर तब्बल १९ वर्षांनंतर उभी राहिली आहे. मात्र वीजजोडणी व तत्सम कामांमुळे ही इमारत अद्याप वापरात नाही.

- संदीप जाधवमहाड : महाड तालुक्यातील वरंध येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत मंजूर झाल्यानंतर तब्बल १९ वर्षांनंतर उभी राहिली आहे. मात्र वीजजोडणी व तत्सम कामांमुळे ही इमारत अद्याप वापरात नाही. सरकारी अनास्थेमुळे आरोग्य सेवेसारख्या मूलभूत सुविधेकरिताही या परिसरातील २० हजार नागरिकांना वर्षानुवर्षे वाट पाहावी लागत आहे. अद्ययावत इमारतीअभावी उपकेंद्राच्या लहान जागेत रु ग्णांची आरोग्यसेवा दिली जात आहे.ग्रामस्थांना आरोग्यसेवा देणे व राष्टÑीय आरोग्यविषयक योजना गाववाड्यांवर पोहचविण्याचे महत्त्वाचे काम प्राथमिक आरोग्य केंद्रांतून होते. महाड तालुक्यातील वरंध येथे जिल्हा परिषदेने १९९९ साली प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले. त्यानंतर २६ जानेवारी २००९ ला तत्कालीन मंत्री सुनील तटकरे यांनी नव्या इमारतीचे भूमिपूजन केले. त्यानंतर सुरू झालेल्या या केंद्राचे नष्टचक्र अद्यापही संपलेले नाही. प्रारंभी केंद्राला इमारत नव्हती. अशावेळी भाड्याच्या जागेत व सध्या उपकेंद्राच्या अपुऱ्या जागेत आरोग्य केंद्राचे कामकाज सुरू आहे. सुरुवातीला या इमारतीसाठी ६५ लाख खर्च येणार होता. परंतु ठेकेदाराला अपघात झाल्याने २०१२ मध्ये या इमारतीचा ठेका रद्द केला, तोपर्यंत या कामावर ३८ लाख रुपये खर्च झाले होते. आठ वर्षे इमारतीचे काम ठप्प झाले होते. यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीच्या कामाला नव्याने वाढीव दराने मंजुरी मिळाली. आता इमारत, कंपाउंड, कमानी असे चांगल्या दर्जाचे काम पूर्ण झाले आहे.परंतु आतील वीज सुविधा व पुरवठा ही कामे बाकी आहेत. यासाठी आठ लाखांच्या निविदा निघाल्या आहेत. हे काम पूर्ण होत नाही तोपर्र्यंत केंद्राचा वापरासाठी सर्वसामान्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.१८ गावे, ४४ वाड्यांना सेवाआरोग्य केंद्रातून वरंध विभागातील १८ गावे, ४४ वाड्यांतील सुमारे २० हजार लोकांना आरोग्यसेवा दिली जाते. नव्या इमारतीत वॉर्डरु म, तपासणी कक्ष, शस्त्रक्रि या कक्ष, प्रशासकीय इमारत अशा सुविधा आहेत. इमारतीसाठी १ कोटी ३५ लाख खर्च करण्यात आला आहे.वरंध प्रा.आ.केंद्राच्या नव्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. केवळ वीज सुविधेची कामे पूर्ण होणे बाकी असून ती काही महिन्यात पूर्ण होतील.- एस.एस.शिर्के, शाखा अभियंता जि.प.बांधकाम विभाग महाड

टॅग्स :Raigadरायगड