शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

रायगड जिल्ह्यात बीएसएनएल इंटरनेट सेवा पुन्हा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 4:33 AM

ग्राहक सेवा केंद्रही बंद : ग्राहकांमध्ये धुमसतोय असंतोष

अलिबाग : रायगड जिल्ह्यात मंगळवारी पुन्हा बीएसएनएल फोन व इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे बीएसएनएल ग्राहकांमध्ये पुन्हा एकदा असंतोष निर्माण झाला. इंटरनेट सेवा बंद झाल्याने एटीएम आणि आॅनलाइन आर्थिक व्यवहार ठप्प झाले. बँकांना सुट्टी असल्यामुळे बँकेमध्ये जाण्याची सोय देखील लोकांना राहिली नाही परिणामी, मोठीच गैरसोय झाली. सुट्टीच्या दिवशी पर्यटनासाठी आलेल्यांनाही मोठा फटका बसला. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात एकूण २३ वेळा बीएसएनएलची इंटरनेट सेवा ठप्प झाली होती. ऐन गणेशोत्सवात बीएसएनएलच्या या समस्येला सामोरे जावे लागले होते.

बीएसएनएलचे फोन आणि इंटरनेट बंद पडण्याचे प्रकार गेल्या महिन्यापासून वारंवार होत आहे. महामार्गा रुंदीकरणामुळे केबल तुटत असल्याचे कारण दिले जात आहे. बहुतांश सरकारी व्यवस्था आता आॅनलाइन चालतात. सरकारचा देखील आॅनलाइन आणि कॅशलेस व्यवहाराचा अट्टाहास आहे. अशा परिस्थितीत, सरकारी कामात व्यत्यय आणणे वा खंडित करणे चुकीचे आहे. बीएसएनएल इंटरनेट सेवा ठप्प होत असल्याने कंपनीवर गुन्हा दाखल का करण्यात येत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.बीएसएनएल ग्राहकांप्रती उत्तरदायित्व नाहीबिल भरले नाही, भरण्यास विलंब झाला तर बिल वसुलीकरिता शेकडो मेसेज पाठविणारे बीएसएनएल, त्यांची सेवा ठप्प झाल्यावर वा ती पुन्हा सुरू झाल्यावर सेवा खंडित का झाली होती? या बाबत ग्राहकांना मेसेज पाठवून माहिती देण्याचे उत्तरदायित्व का निभावत नाही, असा सवाल एका गृहिणीने उपस्थित केला.रायगड जिल्ह्याच्या आॅप्टिकल फायबर केबल(ओएफसी) मध्ये फॉल्ट आल्याने अलिबाग, मुरुडसह जिल्ह्यातील अन्य काही तालुक्यांतील फोन आणि इंटरनेट सेवा बंद पडली. दरम्यान, पोयनाड जवळ बीएसएनएलची ओएफसी एका खोदकामात जेसीबीमुळे तुटल्याने ही समस्या निर्माण झाली होती.- सी. व्ही. राव, महाव्यवस्थापक, बीएसएनएल, रायगडगुन्हा दाखल करण्याची मागणीच्आपत्ती निवारण व्यवस्थेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय आणि जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात कार्यरत ‘आपत्ती निवारण कक्षात’ सुट्टीच्या दिवशी किमान एक सरकारी अधिकारी वा कर्मचारी २४ तासांकरिता उपलब्ध असतो. मात्र, बीएसएनएल ग्राहक तक्र ार निवारण कक्ष रविवारसह कोणत्याही सुट्टीच्या दिवशी बंद असतो.च्बीएसएनएल इंटरनेट सेवा ठप्प असल्याने आॅनलाइन तक्र ार करता येत नाही. बीएसएनएलच्या बेफिकरी बाबत त्यांच्यावर आपत्ती निवारण विषयक कायद्यांतर्गत जिल्हाधिकाºयांनी कारवाई करणे आवश्यक असल्याचा पर्याय कायद्याचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्याने सुचविला.रसायनीत गती मंदावलीच्रसायनी : शहरात बीएसएनएलची इंटरनेट सेवा मंगळवारी सकाळपासूनच धिम्या गतीने सुरू होती. मात्र, काही काळानंतर सेवा पूर्णत: खंडित झाली. त्यामुळे बँक, पोस्ट कार्यालयांव्यतिरिक्त अन्य आॅनलाइन व्यवहारावर परिणाम झाला. काही विद्यापीठांच्या परीक्षांचे अर्ज विलंब शुल्काने आॅनलाइन भरणे, अर्जाचा फॉरमॅट काढून घेणे, माहिती घेणे, एटीएमने पैसे काढण्यासाठी व आॅनलाइनच्या कामाकरिता विद्यार्थी, ग्राहक सायबर कॅफेकडे हेलपाटे मारत होते.

टॅग्स :BSNLबीएसएनएलInternetइंटरनेटRaigadरायगड