म्हसळा : तालुक्यातील केल्टे येथील मेढेकर फूड अँड ब्रेव्हरेज इंडस्ट्रीज कारखान्यावर दगडफेक व कारखान्याचे मालक देवेंद्र मेढेकर यांना जातीवाचक शिवीगाळ करण्याची घटना २३ मे रोजी रात्री घडली. या घटनेची फिर्याद देवेंद्र मेढेकर यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात दिल्यानंतर रामचंद्र बोर्ले, गणेश बोर्ले व अन्य १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. माणगांव येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी सर्व एकवीस जणांनी अर्ज केला होता. परंतु बोर्ले बंधूंचा अर्ज फेटाळत अन्य १९ जणांना माणगांव न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्याचे म्हसळा पोलिसांनी सांगितले. बोर्ले बंधूंच्या शोधात पोलीस असून त्यांना कधीही अटक होऊ शकते. मेढेकर फूड अँड ब्रेव्हरेज इंडस्ट्रीज कारखान्यावर २३ मे रोजी दगडफेक व कारखान्याचे मालक देवेंद्र मेढेकर यांना जातीवाचक शिवीगाळीबाबत मेढेकर यांच्या तक्रारीवरून म्हसळा पोलिसांनी अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह इतर काही गुन्हे २१ जणांवर दाखल केले. यासाठी बोर्ले बंधूंनी अटकपूर्व जामिनासाठी माणगांव उपजिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. परंतु न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला तर अन्य १९ आरोपींना जामीन दिला.(वार्ताहर)
बोर्ले बंधूंचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By admin | Updated: June 15, 2016 01:03 IST