शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 00:11 IST

कर्जत तालुक्यातील कशेळे परिसरातील लोभेचीवाडी येथील जांभळीच्या माळावर बुधवारी अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कर्जत : कर्जत तालुक्यातील कशेळे परिसरातील लोभेचीवाडी येथील जांभळीच्या माळावर बुधवारी अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने मृतदेहाची ओळख पटलेली नाही. हा मृतदेह महिलेचा असल्याचे सांगण्यात येत असून या महिलेचा खून झाला असल्याचे प्राथमिक तपासात पोलिसांकडून समजले आहे.तालुक्यातील लोभेचीवाडी शेजारी असणाऱ्या जांभळीच्या माळावर गावातील मुले क्रिकेट खेळत होती. त्यातील एकाने बॉल जोरदार मारल्याने तो बाजूच्या झाडीत गेला. करवंदीच्या जाळीत बॉल शोधत असताना त्यांना दुर्गंधी आली. तेथे जमिनीतून बाहेर मानवी कवटी असल्याचे दिसले. त्या ठिकाणी कुत्रे जमीन उकरत होती. त्यामुळे मुलांनी तेथून पळ काढून ही घटना ग्रामस्थांना सांगितली. पोलीस पाटील मारुती लोभी यांनी याबाबत पोलीस ठाण्याला कळविले.घटनेची खबर मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, कर्जत पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे आणि कर्मचारी तसेच नायब तहसीलदार सुधाकर राठोड, नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. ऐश्वर्या पवार घटनास्थळी पोहोचले. ग्रामस्थ व कामगारांच्या मदतीने मृतदेह जमिनीतून बाहेर काढण्यात आला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर ते पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळला.पोलिसांनी, डॉक्टरांनी पाहणी केल्यानंतर या महिलेचा खून करून मृतदेह पुरण्यात आला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, अलिबाग येथून श्वानपथक पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.>आरोपींचा शोध सुरूमाळावर गावातील मुले क्रिकेट खेळत होती. त्यातील एकाने बॉल जोरदार मारल्याने तो बाजूच्या झाडीत गेला. बॉल शोधत असताना त्यांना दुर्गंधी आली. तेथे जमिनीतून बाहेर मानवी कवटी असल्याचे दिसले. या महिलेचा खून कोणी केला, कोणत्या कारणासाठी केला याच शोध पोलीस यंत्रणा करत असल्याचे समजते.