शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

पोलादपूर विद्युत वितरण विभागाकडे मंडळाचे दुर्लक्ष, विभागीय कार्यालयांची दुरवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 01:16 IST

Poladpur News : पोलादपूर विद्युत वितरण विभागाकरिता ६५ पदे मंजूर असून, पैकी सध्या केवळ २१ पदांवर कर्मचारी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत, तर ४४ पदे ही गेल्या १० वर्षांपेक्षा जास्त काळापासून रिक्त आहेत.

पोलादपूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाच्या पोलादपूर कार्यालयात १० वर्षांपेक्षा जास्त काळापासून रिक्त असणारी पदे भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे नागरिकांकडून केल्या जाणाऱ्या तक्रारींची दखल घेण्याकरिता कर्मचारी व अधिकाऱ्यांना अतिरिक्त वेळात कामे करावी लागत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे .पोलादपूर विद्युत वितरण विभागाकरिता ६५ पदे मंजूर असून, पैकी सध्या केवळ २१ पदांवर कर्मचारी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत, तर ४४ पदे ही गेल्या १० वर्षांपेक्षा जास्त काळापासून रिक्त आहेत. यापैकी ३६ पदे ही तांत्रिक विभागातील म्हणजेच लाइनमन सहायक अभियंता उपअभियंता दर्जाची पदे असल्याचे समजते. सबस्टेशनमध्ये ४ पदे मंजूर असून, पैकी २ पदे रिक्त आहेत, तर कार्यालयातील ८ पैकी ७ पदे रिक्त आहेत.डोंगराळ व दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलादपूरमध्ये एकूण एकाहत्तर गावांतून १९ हजार ग्राहकांना या २१ कर्मचारी अधिकाऱ्यांमार्फत गेल्या १० वर्षांपेक्षा जास्त काळापासून सेवा अविरत अखंडित देण्याचे कार्य करावे लागत आहे. पोलादपूर तालुक्याचे वार्षिक उत्पन्न सुमारे २ कोटी रुपये एवढे आहे, असे असूनही पोलादपूर विभागाच्या कार्यालयांमध्ये असणारी दुरवस्था व विभागीय कार्यालयांमध्येही किमान नसणाऱ्या सुविधा पाहता, मंडळाकडून अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलादपूरकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.विद्युत वितरण विभागाच्या पोलादपूरमधील दुरवस्थेस मंडळाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत असून, या संदर्भात तातडीने कार्यवाही न झाल्यास नागरिकांकडून आंदोलनाचे हत्यार उपसण्यात येणार आहे.  

वरध विभाग तीन दशकांपासून पोलादपूरकडेचगेल्या ४ दशकांपासून महाड तालुक्यातील वरंध विभाग हा पोलादपूर लाच जोडला गेला असल्याने, या भागातील नागरिकांना आपल्या तक्रारींसाठी अथवा बिले भरण्याकरिता मोठा त्रास सहन करावा लागत असून, याबाबत अनेकदा शासनाकडे मागणी करूनही हा विभाग महाडला जोडण्याकरिता विद्युत मंडळाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याबद्दल वरध विभागातील नागरिक आगामी काळात कधीही आंदोलनाचे हत्यार उपसतील, अशी मानसिकता या भागातील विविध गावांतील नागरिकांची आहे. 

टॅग्स :electricityवीजRaigadरायगड