शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

उरण येथील यूईएस शाळेचे संचालक मंडळ बेकायदेशीर, सह धर्मदाय आयुक्तांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 01:39 IST

उरण : येथील युईएस शाळेचे २००५ पासून आजतागायत नियुक्त झालेले संचालक मंडळच बेकायदेशीर असल्याचा निर्णय मुंबई विभागाचे सह धर्मदाय आयुक्त यांनी दिला आहे.

उरण : येथील युईएस शाळेचे २००५ पासून आजतागायत नियुक्त झालेले संचालक मंडळच बेकायदेशीर असल्याचा निर्णय मुंबई विभागाचे सह धर्मदाय आयुक्त सय्यद अली यांनी संस्थेचे माजी संस्थापक अध्यक्ष नगराज शेठ यांच्या तक्रारीवर दिला आहे. आयुक्तांच्या या निर्णयामुळे मात्र उरणच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.उरण येथील युईएस संस्थेची बारावीपर्यंत शाळा आहे. १९७८ मध्ये स्थापन झालेल्या या तालुक्यातील नामांकित शाळेत सुमारे तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेची स्थापना झाल्यापासूनच नगराज शेठ हे संस्थापक अध्यक्ष म्हणून संस्थेचे कामकाज पाहात होते. त्यांनी शिक्षणाचा दर्जा आणि शिस्त राखून शाळेला लौकिक मिळवून दिला होता. मात्र २००५ साली संस्थेच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप वाढू लागला. त्यामुळे वादविवादही होऊ लागले होते. राजकीय हस्तक्षेपामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि सदस्य असलेल्या नगराज शेठ यांनी सदस्यत्वाचा नव्हे तर अध्यक्ष पदाचा १० जानेवारी २००५ रोजी राजीनामा दिला होता. मात्र त्यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांनी संस्थेचा कारभार मनमर्जीप्रमाणे चालविण्यास सुरुवात केली होती.संस्थेत नगराज शेठ यांचे सदस्यत्व कायम असतानाही त्यांना अंधारात ठेऊन २००५ मध्ये संस्थेच्या कार्यकारी संचालक मंडळाने निवडीचा फार्स केला. संचालक आणि कार्यकारी संचालक मंडळ, सदस्य पदासाठी कोणत्याही प्रकारची निवडणूक न घेता तेच सदस्य, संचालक पदाची निवडीची प्रक्रिया २०१५ आणि आजतागायत कायम ठेवली आहे. संस्थेच्या या अन्यायकारी आणि बेकायदा निवडणूक प्रक्रियेविरोधात संस्थेचे माजी संस्थापक अध्यक्ष नगराज शेठ यांनी मुंबई विभागाच्या धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती.नगराज शेठ यांनी केलेली तक्रार चुकीच्या कागदपत्रांच्या आधारावर करण्यात आली आहे. तसेच त्यावर मुंबई विभागाचे सह धर्मदाय आयुक्त सय्यद अली यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली असल्याची माहिती युईएस संस्थेचे अध्यक्ष तनसुख जैन यांनी दिली. संचालक आणि कार्यकारिणी कमिटीच्या निवडणुकाही नियमानुसार झालेल्या असल्याचा दावाही जैन यांनी माहिती देताना केला आहे.संचालक मंडळाचे विविध निर्णयही संस्थेसाठी अडचणीचे ठरणार?या तक्रारीच्या सुनावणीनंतर २००५ मध्ये झालेल्या संचालक मंडळ, कमिटीची निवड बेकायदा असल्याचा निर्णय मुंबई विभागाचे सह धर्मदाय आयुक्त सय्यद अली यांनी संस्थेचे माजी संस्थापक अध्यक्ष नगराज शेठ यांच्या तक्रारीवर दिला आहे.२००५मध्ये कमिटीची निवडच बेकायदेशीर आहे.त्यामुळे तेंव्हापासून २०१५ पर्यंत कायम करण्यात आलेले संचालक मंडळ, कार्यकारी मंडळही बेकायदेशीर आणि अनधिकृत ठरत असल्याचा निर्वाळाही आयुक्तांनी निकाल पत्रात दिला आहे.आयुक्तांच्या या निर्णयामुळे या दरम्यान संचालक मंडळाने घेतलेल्या विविध निर्णयही संस्थेसाठी अडचणीचे ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.त्यामुळे संचालक मंडळ बरखास्त करून या प्रकरणी संस्थेचा कारभार पाहाण्यासाठी प्रशासक नियुक्तीच्या चर्चाही सुरु झाल्या आहेत. मात्र त्यामुळे उरणच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Schoolशाळा