आदिवासीवाडीवर तरुणाचा खून

By Admin | Updated: November 16, 2016 04:42 IST2016-11-16T04:42:03+5:302016-11-16T04:42:03+5:30

पत्नीशी बोलत असल्याचा राग धरून संशयावरून १८ वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. ही घटना सोमवारी रात्री

The blood of the youth on the Adivasi wadi | आदिवासीवाडीवर तरुणाचा खून

आदिवासीवाडीवर तरुणाचा खून

अलिबाग : पत्नीशी बोलत असल्याचा राग धरून संशयावरून १८ वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. ही घटना सोमवारी रात्री अलिबाग तालुक्यातील वाडगाव आदिवासीवाडी येथे घडली. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मंगळवारी दुपारी अलिबाग न्यायालयात आरोपीला हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १७ नोव्हेंबरपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
संदीप वाघमारे (१८) असे मृत तरुणाचे नाव आहे. अलिबाग तालुक्यातील वाडगाव आदिवासीवाडी येथे हा तरुण राहात होता. त्याच गावात आरोपी (२२ वर्षे) ही राहात होता. तो त्याची पत्नी व दोन मुले असा त्याचा परिवार आहे. सोमवारी किहीम या ठिकाणी आदिवासी समाजासाठी क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले होते. या क्रि केट सामन्यासाठी आरोपी गेला होता. सामने झाल्यानंतर सोमवारी रात्री ९ वाजता तो वाडगाव आदिवासीवाडी येथे त्याच्या घरी आला. त्या वेळी त्याची पत्नी संदीप वाघमारे या तरु णाशी बोलत होती. याबाबत राग धरून आरोपीने संशयावरून वाघमारे याच्या मानेवर कोयत्याने वार केला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती अलिबाग पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक सुरेश वराडे, सहायक पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला ताब्यात घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: The blood of the youth on the Adivasi wadi