शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

घातपात की खून ? कर्जत शहरात महिलेचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 02:27 IST

कर्जत शहरातील मानस कॉम्प्लेक्समधील एका गृहिणीचा संशयास्पद मृत्यू झाला असून, त्या महिलेच्या मृत्यूबद्दल कर्जत शहरात चर्चेला उधाण आले आहे.

कर्जत : कर्जत शहरातील मानस कॉम्प्लेक्समधील एका गृहिणीचा संशयास्पद मृत्यू झाला असून, त्या महिलेच्या मृत्यूबद्दल कर्जत शहरात चर्चेला उधाण आले आहे. कर्जत पोलीस ठाण्यात या महिलेच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून कर्जत पोलिसांकडून त्या मृत्यूबद्दल सावध पावले उचलली जात आहेत.कर्जत शहरातील मानस कॉम्प्लेक्सचा झपटसिंग कुमान हा रखवालदार आपली पत्नी आणि मुलांसह राहत आहे. त्याची पत्नी लक्ष्मी यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्या महिलेचे पती कुमान यांना सोमवारी दुपारी ३ वाजता घरी परत आल्यानंतर कळली. त्या वेळी लक्ष्मी यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला, तसेच कानाला जखम झाली होती. रखवालदार कुमान याने ही माहिती आपला शेजारी आणि त्यांच्या माध्यमातून कर्जत पोलिसांना सांगितली.घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपअधीक्षक जालिंदर नालकूळ, कर्जतच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे आणि त्यांचे पथक पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य शिंदे तसेच एस. एस. राजमाने, सचिन व्हसकोटी, पी. एम. पाटील, डी. डी. देशमुख घटनास्थळी दाखल झाले.लक्ष्मी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्जत उपजिल्हारु ग्णालयात नेला. कर्जत पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ एक तपास पथक या कामासाठी लावले असून, त्या महिलेचा मृत्यू हा घातपात की त्यांचा खून करण्यात आला आहे याचा शोध कर्जत पोलीस घेत आहेत. मात्र, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण नागरिकांमध्ये आहे.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा