शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

खोपोलीतील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; महिलेचा मृत्यू

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 5, 2020 10:16 IST

या स्फोटात जसनोव्हा कंपनी शिवाय एसएस पेपर ट्यूब आणि पेन ट्यूब या कंपन्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. एवढेच नाही, तर आर्कोस औद्योगिक नगरीच्या आसपास एक किलोमीटरच्या परिसरातीतल अनेक घरांच्या खिडक्यांच्या आणि कंपन्यांच्या काचाही फुटल्या.

ठळक मुद्देहा स्फोट एवढा भीषण होता, की जवळपास दोन ते तीन किलोमीटरपर्यंत याचा हादरा बसला. या हादऱ्यामुळे शेजारच्या काही कंपन्यांचे शेडही कोसळले.एक किलोमीटरच्या परिसरातीतल अनेक घरांच्या खिडक्यांच्या तसेच अनेक कंपन्यांच्या काचाही फुटल्या.

रायगड : खोपोली तालुक्यातील साजगाव परिसरातील एका कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात वैष्णवी उर्फ सपना कृष्णा निवबाने (वय-३२) या महिलेचा मृत्यू झाला. तर मृत महिलेचा पती आणि तीन मुले (11 व 1.5 वर्षांच्या 2 मुली, मुलगा 9 वर्ष) जखमी झाले आहेत. तसेच इतर 2 कामगारही या स्फोटात जखमी झाले असून जखमींना नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आरकोस इंडस्ट्रियल प्रिमायसेस सहकारी संस्था, ढेकूतील प्लॉट नं.26, जेसनोवा फार्मसिटिकल अँड स्पेशॅलिटी केमिकल्समध्ये मध्यरात्री २.४० वाजण्याच्या सुमारास हा भीषण स्फोट झाला. या स्फोटात प्लॉट नं. 21, 22, 24, 25 मधील कंपन्याही प्रभावित झाल्या आहेत. हा स्फोट एवढा भीषण होता, की जवळपास दोन ते तीन किलोमीटरपर्यंत आवाज घुमला. या हादऱ्यामुळे शेजारच्या काही कंपन्यांचे शेडही कोसळले. एवढेच नाही, तर आरकोस औद्योगिक नगरीच्या आसपास एक किलोमीटरच्या परिसरातीतल अनेक घरांच्या खिडक्यांच्या आणि कंपन्यांच्या काचाही फुटल्या.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या स्फोटामुळे लागलेली आग एवढी मोठी होती, की तब्बल चार तासांच्या प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. 

स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेतली आणि जवळपास असलेल्या कंपन्यांतील कामगारांना सुरक्षितस्थळी हलवले. जखमींना खोपोली नगरपरिषदेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Blastस्फोटRaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र