शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मावळ, रायगड भाजपलाच मिळणार; केंद्रीय निरीक्षक प्रमोद सावंत यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 07:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कर्जत / पेण : रायगड लोकसभा मतदारसंघ हा भाजपलाच मिळायला हवा, असा आग्रह पेणमधील कार्यकर्ता मेळाव्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत / पेण : रायगड लोकसभा मतदारसंघ हा भाजपलाच मिळायला हवा, असा आग्रह पेणमधील कार्यकर्ता मेळाव्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक व गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे धरला. त्यानंतर सावंत यांनी कोकणात अजून कमळ फुलले नाही, आता रायगड, मावळ आणि सिंधुदुर्ग तीनही लोकसभा मतदारसंघ भाजपलाच मिळावेत, यासाठी मी केंद्रीय नेतृत्त्वाकडे शंभर टक्के प्रयत्न करेन, असे आश्वासन त्यांनी दिले. 

कर्जत येथे माजी मंत्री बाळा भेगडे, सुरेश लाड, प्रशांत ठाकूर यांनी तीनही विधानसभा मतदारसंघात महायुतीचेच आमदार निवडून येतील, असे सांगत मावळचा उमेदवार दोन लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून येईल, असा विश्वास यावेळी बोलून दाखवला. पेण येथे बाळासाहेब पाटील यांनी कोकणातील तीनही मतदारसंघात लोकसभा उमेदवार भाजपचे उमेदवार पाहिजेत, अशी मागणी केली. त्यानंतर धैर्यशील पाटील यांनी लोकसभेची उमेदवारी मिळावी, ही माझी व कार्यकर्त्यांची इच्छा असून, आमचा निरोप वरिष्ठांपर्यंत पोहोचवा, अशी अपेक्षा व्यक्त केली. आमदार रवी पाटील यांनी रायगड लोकसभेची जागा आम्हाला द्या, नाहीतर आम्ही वेगळी भूमिका घेऊ, असे यावेळी सूचित केले. 

‘विकासाच्या नावावर मते मागा’डॉ. प्रमोद सावंत हे मंगळवारी रायगड दौऱ्यावर होते. मावळ लोकसभा मतदारसंघाचे बूथ कार्यकर्ता महासंमेलन कर्जतच्या किरवली येथे आयोजित केले होते, तर पेण येथे बुथ कार्यकर्ता मेळावा होता. या दोन्ही ठिकाणी सावंत यांनी मार्गदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतका विकास केला आहे, की जात, धर्माच्या नावावर नाहीतर विकासाच्या नावावर मते मागायची आहेत, असे आवाहन त्यांनी केले. 

टॅग्स :BJPभाजपा