शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

मुरूडमध्ये मच्छीमारांचे कोट्यवधीचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 11:56 PM

आगरदांडा येथील २० बोटी फु टल्या

संजय करडे।लोकमत न्यूज नेटवर्कमुरुड : तालुक्यातील आगरदांडा येथील समुद्रात वादळ होणार म्हणून राजपुरी येथील लोकांनी आपल्या सहा सिलिंडर असणाऱ्या मोठ्या बोटी आगरदांडा येथील बंदरात शाकारून ठेवल्या होत्या; परंतु वादळी वाºयाने येथील २० बोटींचे मोठे नुकसान केले आहे. वाºयाच्या प्रचंड वेगामुळे येथील मोठ्या बोटी एकमेकांवर आदळून फुटल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. एक बोट नवीन उभरणीसाठी किमान ३५ लाखांचा खर्च येत असतो. अशा वादळामुळे मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. २० बोटी फुटल्यामुळे मच्छीमारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

मुरूड शहरातील मासळी मार्केटच्या मागे मासळी विक्रीसाठी लिलाव करण्यासाठी मोठ्या पत्र्याच्या शेडची उभारणी करण्यात आली होती; परंतु या वादळात ती शेड भुईसपाट झाली आहे. चार वर्षांपूर्वीच ही शेड सुमारे साडेसात लाख रुपये खर्च करून बांधण्यात आली होती; परंतु या वादळात ती पडल्याने मोठे नुकसान कोळी समाजाला सहन करावे लागले आहे.

याबाबत अधिक माहिती सांगताना कोळी समाजाचे अध्यक्ष मनोहर बैले यांनी या शेडमधून मासळी विक्री चालत असे. मात्र वादळामुळे शेड पडली असून शासनाने आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आहे.नांदगाव मुरुड सर्वे काशीद येथील मोठमोठ्या सुपारी व नारळाच्या बागा आहेत; परंतु वेगाने वाहणाºया वाºयाने सुपारीचे झाडे मुळासकट पडल्याने येथील बगायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. एक सुपारीचे झाड १० वर्षांनंतर पीक देते; परंतु या वादळाने सदरची झाडे पडल्याने सुपारीच्या पिकात मोठी घट होणार आहे. मुरुड तालुक्यात ९०० हेक्टर जमिनीवर नारळ-सुपारीचे उत्पन्न घेतले जाते. त्यापैकी सर्वच बागायत जमिनीतील सुपारीची झाडे सर्वाधिक पडल्यामुळे सुमारे तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त मोठे नुकसान झाले आहे.याबाबत नांदगाव येथील बागायतदार चिंतामणी जोशी यांनी या नारळ-सुपारीच्या बागा आमच्या पूर्वजांनी विकसित केल्या होत्या. या वादळामुळे सर्व झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे अतीव दु:ख झाले आहे. सर्व बागायतदारांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

एनडीआरएफने केले रस्ते मोकळेमहसूल प्रशासनाने मुरूड तालुक्यातील सुमारे ३,४५० लोकांना धोक्याच्या ठिकाणाहून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले होते. त्यामुळे मुरूड तालुक्यात जीवितहानी झाली नाही; परंतु मालमतेचे प्रचंड नुकसान झाले आहे. रस्त्यावर मोठमोठी वडाची झाडे उन्मळून पडली. ती बाजूला करण्यासाठी एनडीआरएफचे पोलीस निरीक्षक मनोज घोष यांच्या नेतृत्वाखाली २२ जवानांची टीम मुरूडमध्ये आली होती, त्यांनी रस्त्यावर पडलेली मोठमोठी झाडे कटरच्या साह्याने तोडून रस्ता मोकळा करून दिला आहे.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ