शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निघाले बाप्पा विदेशात, आकर्षक मूर्तींना आफ्रिकेत मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 03:59 IST

थायलंडचे भक्त पेणमध्ये : जेएनपीटी बंदरातून मूर्ती रवाना

पेण : भक्तांच्या लाडक्या बाप्पाचा उत्सव अवघ्या २० दिवसांवर येऊन ठेपला आहे, त्यामुळे पेणच्या दीपक कलाकेंद्रातून थायलंडच्या थाई समाजाच्या महिलांनी प्रत्यक्ष येऊन बाप्पाच्या पाच फुटी, आठ फुटी अशा मोठ्या मूर्तींची खरेदी केली. शुक्रवारीच जेएनपीटी बंदरातून समुद्रमार्गे कंटेनरमधून या मूर्ती परदेशात रवाना झाल्या आहेत. तब्बल १८ दिवसांच्या प्रवासाअंती त्या थायलंडमध्ये दाखल होऊन गणेशोत्सव मंडपांमध्ये दाखल होणार आहेत. थाई समाजाच्या महिलांनी १५ मोठ्या बाप्पाच्या मूर्ती पेणमधील दीपक कलाकेंद्रातून खरेदी केल्या. बाप्पाच्या मूर्तीच्या देखण्या, आकर्षक रूपाने त्या अतिशय आनंदित झाल्या होत्या.

१३ सप्टेंबर गणेश चतुर्थीलाच थायलंडमध्ये गणेशोत्सव साजरा होतो. थायलंडमध्ये बाप्पाच्या मूर्ती तेथील कलाकार बनवितात. मात्र, त्या गणपतीच्या मूर्तींना पेणच्या कलात्मकतेचे साधर्म्य दिसून येत नाही. थायलंडमध्ये यापूर्वीही पेणच्या कार्यशाळेतून मूर्ती नेण्यात आल्या. मात्र, यंदा पहिल्यांदाच थाई महिला भारतात आल्या आणि त्यांनी गाइडच्या साहाय्याने पेणमध्ये येऊन पाच फुटी, आठ फुटी अशा मोठ्या मूर्तींची खरेदी करून शुक्रवारीच थायलंडला रवाना झाल्यात.

आफ्रिका खंडात २०० मूर्ती रवानाच्२० दिवसांपूर्वी आफ्रिका खंडात सुद्धा २०० मूर्ती गेल्याचे मूर्तिकार दीपक समेळ यांनी सांगितले. यंदा अफ्रिका खंडातील टांझानिया येथे या गणेशमूर्ती अनिवासी भारतीयांनी नेल्या आहेत. च्ही पहिलीच आॅर्डर असल्याचे समेळ यांनी सांगितले. गणेशोत्सवासाठी परदेशातील मागणी वाढत असून वेळेअभावी ती पोहोच करणे शक्य होणार नाही; परंतु गणेशोत्सवाची शान व मान, सन्मान परदेशातही भक्तिभावाने होत असल्याचे समेळ यांनी सांगितले.

टॅग्स :RaigadरायगडGaneshotsavगणेशोत्सव