शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बँके वर दरोडा टाकणारे अटकेत;२४ तासांत तिघे चोरटे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 05:13 IST

मुरु ड तालुक्यातील नांदगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेवर दरोडा टाकू न चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला होता. परंतु नांदगाव ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपींना २४ तासांत पकडण्यात मुरु ड पोलिसांना यश आले आहे.

नांदगाव/ मुरु ड : मुरु ड तालुक्यातील नांदगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेवर दरोडा टाकू न चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला होता. परंतु नांदगाव ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपींना २४ तासांत पकडण्यात मुरु ड पोलिसांना यश आले आहे. एका आरोपीची बारीक डोळ्याची ठेवण असल्यामुळे प्रथम त्याला ताब्यात घेण्यात येऊन मग इतर दोघांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आल्याची माहिती मुरु ड पोलिसांनी दिली. यातील तीनपैकी दोन आरोपी हे अल्पवयीन असल्याने त्यांचा खटला कर्जत येथील बालगुन्हेगार कोर्टात चालणार आहे.नांदगाव येथील या बँकेत रविवारी पहाटे २.३०च्या दरम्यान नांदगाव येथील राहणारे सन्नी संदीप कंटक (१८ वर्षे पूर्ण) व त्याचे साथीदार निखिल लक्ष्मण कुमरोटकर, साहिल कुमरोटकर या तिघांनी मिळून नांदगाव शाखेत खिडकीची तावदाने तोडून आत प्रवेश केला होता. या बँकेची तिजोरी तोडण्यासाठी सोने वितळवण्यासाठी जो गॅस कटर वापरतात तो घेऊन या तिघांनी आत प्रवेश केला होता. तिजोरी गॅस कटरने तोडण्याचा प्रयत्न केला, परंतु उपयोग न झाल्याने हताश होऊन बँकेचा संगणक संच, सीसीटीव्हीचा डीव्हीआर युनिट आदी साहित्य घेऊन पोबारा केला होता.याबाबत अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी सांगितले की, नांदगाव ग्रामपंचायतीमध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, परंतु या चोरट्यांना दर्शनी भागात असणारा कॅमेराच दिसला याच कॅमेºयावर लक्ष ठेवणारा कॅमेरा या तिघांनाही दिसला नाही. दर्शनी भागात असलेल्या कॅमेरा झाकण्याचा या प्रयत्न केला व हे तिघेही कॅमेºयात कैद झाले. चोरी करताना डोक्यावर पट्टी बांधली होती. तोंडावर या तिघांनी रु माल बांधला होता. सन्नी कंटक याचे डोळे बारीक असल्यामुळे याला स्थानिक नागरिकांनी त्वरित ओळखले व त्याला पकडण्यात यश आले. या तिन्ही आरोपींवर घरफोडी करणे, बंद असलेल्या जागेत चोरी करणे असे आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा