शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘बहुजन हिताय-बहुजन सुखाय’ हाच विचार प्रेरक; केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 11:08 IST

किल्ले रायगडावर श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ (पुणे) आणि स्थानिक उत्सव समिती, महाड यांच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या  ३४२ वी शिवपुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम झाला.

महाड : छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीपातीच्या आणि अंधश्रद्धेच्या पलीकडे जात अखंड भारताचे स्वप्न साकार केले. ‘बहुजन हिताय- बहुजन सुखाय’ या त्यांच्या विचारातूनच देश पुढे गेला पाहिजे, असे प्रतिपादन नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले.किल्ले रायगडावर श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ (पुणे) आणि स्थानिक उत्सव समिती, महाड यांच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या  ३४२ वी शिवपुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम झाला. यावेळी आमदार भरत गोगावले, प्रशांत ठाकूर, समितीचे अध्यक्ष रघुजी आंग्रे आदी उपस्थित होते. यावेळी सिंधिया यांनी आपण पाहुणे नसून या मातीमधलाच एक असल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवा आणि समर्पण या दोन गुणांचा अवलंब केल्यास देशाचे कल्याण होईल, असे सांगितले. मराठ्यांचा इतिहास देशाच्या कानाकोपऱ्यांत असून शौर्य, बलिदान, आणि वीरता असलेला इतिहास असल्याचे सांगितले.नौसेना उभी करून समुद्रतटाचेही रक्षण कसे करावे हे दाखवून दिले. महाराजांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन आपल्या विविध आरमारात वेगवेगळ्या जाती-धर्माच्या लोकांना सामावून घेत स्वराज्याची निर्मिती केली. महाराजांच्या या विचाराचे आचरण केल्यास देशाचे कल्याण होईल, असेही स्पष्ट केले. यामुळेच महात्मा जोतिबा फुले यांनी त्यांना कुळवाडीभूषण ही संबोधले होते तर बडोद्याचे गायकवाड आणि कोल्हापूरचे शाहू महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार डोळ्यांसमोर ठेवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनादेखील शिक्षणाला चालना दिली होती, असे सांगितले.

श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्काराचे झाले वितरणसमितीच्या वतीने देण्यात येणारा श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार भारतीय नौदलातील निवृत्त सर्जन कमांडर व इतिहास संशोधक डॉ. उदय कुलकर्णी यांना देण्यात आला, तर विशेष सत्कार सैन्यदल अधिकारी व्हाईस ॲडमिरल मुरलीधर पवार यांचा सपत्नीक करण्यात आला. यावेळी सुभेदार तानाजी मालुसरे व सूर्याजी मालुसरे यांच्या वंशजांचा सत्कारही केला. शिवरायमुद्रा आणि शिवऋषींची शिवसृष्टी या ग्रंथांचे प्रकाशनदेखील करण्यात आले. या कार्यक्रमाला शिवप्रेमी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेBJPभाजपाRaigadरायगड