शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
11
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
12
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
13
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
14
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
15
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
16
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
17
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
18
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
19
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
20
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन

लक्ष्मीच्या आराधनेसाठी ‘को जागर्ति’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:45 IST

भारतातील प्रत्येक सण ऋतुमानातील बदलांच्या अनुषंगाने साजरे केले जातात. शरद ऋतूच्या आगमनाने वातावरणात एक प्रसन्नता असते. आकाश स्वच्छ होऊन चंद्र आणि चांदण्याचा प्रकाश थेट जमिनीवर येतो.

भारतातील प्रत्येक सण ऋतुमानातील बदलांच्या अनुषंगाने साजरे केले जातात. शरद ऋतूच्या आगमनाने वातावरणात एक प्रसन्नता असते. आकाश स्वच्छ होऊन चंद्र आणि चांदण्याचा प्रकाश थेट जमिनीवर येतो. हवेत हळूहळू गारवा वाढू लागतो. चंद्र व चांदण्यांच्या शीतल, शांत किरणांची अनुभूती कौजागिरी पौर्णिमेच्या दिवशी येते. शेतकरी तयार पिकांची कापणी करून, नव्या पिकाची म्हणजेच, भाताच्या कणसांच्या दाण्यांची पूजा या दिवशी करतात. हा उत्सव महाराष्ट्राबरोबर पश्चिम बंगाल, ओडिसा व गोव्यामध्येही साजरा केला जातो.अश्विन पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. कोजागिरी पौर्णिमेला अध्यात्मिक महत्त्व असून, या दिवशी करण्यात येणाºया व्रताला ‘कोजागिरी व्रत’ असेही म्हणतात. या दिवशी लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्र देवाची पूजा केली जाते. लक्ष्मी प्रसन्न व्हावी, तिचा वरदहस्त लाभावा म्हणून मोठ्या उत्साहाने तिची आराधना करतात. याबाबत अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत.या दिवसाबाबत अशी आख्यायिका आहे की, उत्तररात्री साक्षात लक्ष्मी देवी पृथ्वीवर येऊन ‘को जागर्ति’ ( म्हणजे, कोण जागत आहे) असे विचारते. त्यामुळे या दिवसाला ‘कोजागिरी पौर्णिमा’ असेही म्हणतात. लक्ष्मीच्या स्वागतार्ह रस्ते, घर, मंदिर, उद्यान आदी ठिकाणी दिवे लावले जातात.महाराष्ट्रात लक्ष्मीची विधिवत पूजा करून आटीव दुधांचा नैवेद्य बनवून तो चंद्राला दाखवितात. त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ घालतात. चंद्राची पूजा करून त्या दुधात त्याचे प्रतिबिंब बघून त्यानंतर कुटुंबीय तो नैवेद्य प्राशन करतात. उत्तररात्री लक्ष्मी आगमन होत असल्याने तिच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी दिवे लावले जातात. जेणेकरून घरात तिने प्रवेश करून ते घर धनधान्यांनी समृद्ध राहते, अशी श्रद्धा आहे.राजस्थानात या दिवशी स्त्रिया शुभ्र वस्त्रे परिधान करून चांदीचे दागिने घालतात. राजपूत रात्री चंद्राची पूजा करून ब्राह्मणांना शर्करायुक्त दूध देतात.बंगाली राज्यात ‘लोख्खी पूजा’ या नावाने हा उत्सव साजरा केला जातो. देवी लक्ष्मीची सेवा केली जाते.गुजरातमध्ये अश्विन पौर्णिमेला ‘शरद पूनम’ म्हणून संबोधले जाते. गरबा आणि दांडिया रास हे पांरपरिक नृत्य खेळून, रात्रीचा जागर करून, भक्तिभावाने शरद पूनम साजरी करतात.गोव्यात हा दिवस ‘नवे’ उत्सव म्हणून साजरा होतो. रात्री चंद्राची पूजा करून आटवलेल्या दुधाचा नैवेद्य दाखविला जातो. त्यामुळेच या पौर्णिमेला ‘कौमुदी’ असे म्हणतात. कौमुदी म्हणजे चंद्राचे शुभ्र चांदणे. चंद्राला नैवेद्य दाखवून सहकुटुंब एकत्र येऊन गप्पा, गाणी, खेळ खेळून रात्रीचा जागर केला जातो. देवी-देवतांच्या मंदिर परिसरात दीप लावून कोजागिरीनिमित्त दिव्यांच्या प्रकाशात आणि चंद्राच्या शीतल चांदण्यांत विधिवत लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते.ओडिसा राज्यात ‘कोजागराह’ या नावाने अश्विन पौर्णिमा साजरी केली जाते. घर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून दारात रांगोळी काढली जाते. देव्हाºयातील देव स्वच्छ करून घरासमोर ठेवले जातात. त्यानंतर मूर्तीची विधिवत पूजा करून देवासाठी लोणी, बत्ताशे, पायस आदी गोड पदार्थ पानावर वाढून ते देवांना अर्पण करतात. पौर्णिमेच्या रात्री त्या देवांच्या मूर्ती तिथेच ठेवून रात्रभर जागर करतात.रीना चव्हाण

टॅग्स :Raigadरायगड