शहरं
Join us  
Trending Stories
1
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
2
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
3
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
4
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
5
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
6
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
7
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
8
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
9
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
10
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
11
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
12
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
13
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
14
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
15
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
16
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
17
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!
18
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
19
फायदेच फायदे! साखर नसलेला चहा आरोग्यासाठी गुणकारी, वजन कमी करण्यासाठी प्रभावी
20
ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट

नांदगाव उपकेंद्राला डॉक्टरांअभावी टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:16 IST

इमारत बांधल्यापासून बंदच; रुग्णांना घ्यावा लागतो खासगी रुग्णालयांचा आधार

- विनोद भोईर पाली : सुधागड तालुक्यातील नांदगाव उपआरोग्यकेंद्र बांधून चार वर्षे झाली तरी आजतागायत डॉक्टरअभावी या उपकेंद्राच्या इमारतीला टाळेच आहे. नांदगाव पंचक्रोशीत तोरंकेवाडी, फणसवाडी, गोमाशी, पोटलज, दिघेवाडी, गोंडाळे, म्हसेवाडी, खरबाची वाडी, गोकूळ वाडा या सात आदिवासीवाड्या येथे पाच ते सहा हजार वस्ती आहे. येथील नागरिकांना नांदगाव येथील उपकेंद्र बंद असल्याने उपचारासाठी १५ किलो मीटर अंतरावर असलेल्या पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी यावे लागत आहे.पालीत येऊनही डॉक्टर उपलब्ध नसल्यास खासगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागत आहेत. यातही खासगी दवाखान्यात भरमसाठ फी घेतली जात आहे, यामुळे मोठा आथिक भुर्दंड सोसावा लागत आहे. नांदगाव पंचक्रोशीत कोणतेही उद्योग नसल्याने आर्थिक क्षमता वाढविण्याचे साधन नाही. शेतीत पिकविलेले धान्य विकून उपचार घेणे भाग पडत आहे. अशा वेळी शासन आरोग्यकेंद्रावर कोटी रुपये खर्च करत आहे. मात्र, याचा गोरगरीबास लाभ मिळत नाही. खासगी दवाखान्यात उपचार घेण्यासाठी सावकाराकडून व्याजदराने रक्कम घ्यावी लागते, अशी या विभागात गंभीर परिस्थिती आहे.या नांदगाव पंचक्रोशीतील जनतेसाठी कायम डॉक्टर मिळावेत, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे, नाहीतर आठवड्यातून तीन वार डॉक्टर आले तरी चालतील. नांदगाव उपआरोग्यकेंद्र सुरू करा, कारण नांदगाव पंचक्रोशी डोंगराळ असल्याने सर्प, विंचू जास्त प्रमाणात आहेत. शेतकऱ्याला शेतीत काम करत असताना सर्प, विंचूदंशला सामोरे जावे लागत आहे. पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधे उपलब्ध नसल्याने अलिबाग रुग्णालयात जावे लागत आहे. यासाठी पालीमध्येही औषधे उपलब्ध करा, अशी मागणी केली जात आहे.नांदगाव उपआरोग्य केंद्र बांधून चार वर्षे झाली, तरी आजपर्यंत बंद असल्याने येथील नागरिकांना उपचारासाठी तालुक्याच्या मुख्य ठिकाणी जावे लागते. मग ही इमारत काय कामाची?- योगेश शिंदे, नांदगाव ग्रामस्थउपआरोग्य केंद्रात डॉक्टरची पोस्ट नसते; परंतु सीएचओ पोस्ट ही उपआरोग्य केंद्रात तयार करण्यात येणार आहे. मात्र, ट्रेनिंग चालू असल्याने सहा महिने त्याची ट्रेनिंग झाल्यावर त्यांना पोस्टिंग देण्यात येणार आहे.- डॉ. ए. व्ही. मुळे, वैद्यकीय अधिकारी, खवली