नवी मुंबई : कर थकीत ठेवलेल्या तसेच खाजगी संवर्गात रुपांतर झालेल्या तरीही रस्त्यावर आढळलेल्या, क्रमांक व कोणतीही कागदपत्रे नसल्याने जप्त केलेल्या १४६ आॅटो रिक्षांचा पनवेल आटीओ कार्यालय २२ डिसेंबर रोजी लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावातील वाहने घेणाऱ्या नागरिकांना अटी व शर्ती तसेच अनामत रक्कम याबाबतची माहिती पनवेल आटीओ कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक नागरिकांनी या लिलावात भाग घेण्याचे आवाहन पनवेलचे आरटीओ अधिकारी लक्ष्मण दराडे यांनी केले आहे. पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयात महाराष्ट्र वाहन कायद्यानुसार वायुवेग पथकातील अधिकाऱ्यांनी काही आॅटो रिक्षा जप्त केल्या आहेत. (प्रतिनिधी)
पनवेलमध्ये जप्त केलेल्या १४६ रिक्षांचा लिलाव
By admin | Updated: December 22, 2016 06:20 IST