सहायक पोलीस निरीक्षकाचा लोकलच्या धडकेने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 02:30 AM2019-11-03T02:30:24+5:302019-11-03T02:30:42+5:30

पनवेलजवळ रेल्वे रूळ ओलांडताना अपघात । मुरुड पोलीस ठाण्यात होते कार्यरत

Assistant police inspector dies in local beating | सहायक पोलीस निरीक्षकाचा लोकलच्या धडकेने मृत्यू

सहायक पोलीस निरीक्षकाचा लोकलच्या धडकेने मृत्यू

Next

पनवेल : रायगडमधील मुरुड पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक विनोद तांबोळी (४४) यांचा ट्रेनच्या धडकेने जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली. पनवेलनजीक सिमरम मोटर्सच्या मागील बाजूस रेल्वेरूळ उलांडताना ही घटना घडली. घटनेत विनोद तांबोळी यांचा जागीच मृत्यू झाला. विनोद तांबोळी यांच्या पत्नीही पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांना एक मुलगा आहे. तो महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तांबोळी यांचे पनवेल उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. संबंधित घटनेची नोंद पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

कर्तव्यदक्ष अधिकारी
मुरुड पोलीस ठाण्याच्या कार्यभार तांबोळी यांनी जुलै २०१९ मध्ये स्वीकारला होता. कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. चार दिवसांपूर्वीच ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी ते कुटुंबासह आले होते.
 

Web Title: Assistant police inspector dies in local beating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.