शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
5
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
6
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
7
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
8
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
9
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
10
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
11
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
12
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
13
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
14
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
15
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
16
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
17
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
18
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
19
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
20
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा

अर्णब गोस्वामींची तळोजा कारागृहातून सुटका; समर्थकांची घोषणाबाजी

By कुणाल गवाणकर | Updated: November 11, 2020 21:45 IST

अर्णब गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर; इतर दोन आरोपींनादेखील जामीन

पनवेल: अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक असलेले पत्रकार अर्णब गोस्वामी यांना बुधवारी सुप्रीम कोर्टांने जामीन मंजूर केला.रात्री 8.15 वाजता अर्णब तळोजा कारागृहातून बाहेर आले. यावेळी गोस्वामी हे बाहेर पडताच गाडीतूनच 'भारत माता कि जय' अशा घोषणा देऊ लागले. त्यांच्या समर्थकांनी कारागृह परिसरात मोठी गर्दी केली होती.अर्णब जिंदाबाद, भारत माता कि जय यांसारख्या घोषणा सुरु केल्या होत्या. विशेष म्हणजे कारागृह परिसरात वाढती गर्दी लक्षात घेता पोलिसांचा चोख बंदोबस्त याठिकाणी ठेवण्यात आला होता. अर्णबच्या समर्थनार्थ कारागृहासमोरील रस्त्यावर समर्थकांनी 'हॅपी दिवाळी अर्णब,' 'सत्यमेव जयते' अशा आशयाच्या रांगोळ्या काढल्या होत्या. कारागृहातून बाहेर पडणाऱ्या अर्णबचे स्वागत मोबाईलची टॉर्च लावून सर्वानी केले.सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासाअर्णब गोस्वामी यांना न्यायालयानं आज जामीन मंजूर केला आहे. गोस्वामी यांच्यासोबतच प्रकरणातल्या आणखी दोन आरोपींनादेखील जामीन मंजूर झाला आहे. गोस्वामी यांनी दिलासा नाकारणं ही मुंबई उच्च न्यायालयाची चूक होती, असं महत्त्वपूर्ण विधान सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान केलं. इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अटक करण्यात आली होती. नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत गोस्वामींचं नाव होतं. त्यामुळे रायगड पोलिसांनी त्यांना अटक केली. यानंतर गोस्वामींनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला. मात्र त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आज या प्रकरणी सकाळी साडे दहापासून सुनावणीस सुरुवात झाली. न्यायालयात ज्येष्ठ वकील हरीश साळवेंनी अर्णब यांची बाजू मांडली....तर मुख्यमंत्र्यांना अटक करणार का? हरीश साळवेंचा सर्वोच्च न्यायालयात सवालअर्णब गोस्वामी सध्या तळोजा कारागृहात आहेत. लवकरच त्यांची कारागृहातून सुटका होईल. गोस्वामींच्या जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. 'सरकार त्यांच्या अधिकारांचा दुरुपयोग करत असल्यास त्यात न्यायालय हस्तक्षेप करू शकतं. अन्यथा परिस्थिती गंभीर होईल,' असं न्यायालयानं म्हटलं. अर्णबप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची राज्य सरकार आणि हायकोर्टाला फटकार, नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण

नेमकं काय आहे प्रकरण?२०१८ मध्ये अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमूद यांची आत्महत्याकॉनकॉर्ड डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अन्वय नाईक (Anvay Naik) आणि त्यांच्या आई कुमूद यांनी २०१८ मध्ये रायगडमध्ये आत्महत्या केली. आपल्या आत्महत्येस अर्णब गोस्वामी, फिरोझ शेख आणि नितीश सारडा जबाबदार असल्याचा उल्लेख त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला होता. या तिघांनी आपले ५.४० कोटी रुपये थकवल्याचं अन्वय यांनी सुसाईट नोटमध्ये म्हटलं होतं. " अर्णब गोस्वामी यांची चिंता व्यक्त केली हे चांगले, पण..." : शरद पवारांचा राज्यपालांना टोला अर्णब आणि अन्वय यांच्यात कशावरून वाद झाला?अर्णब गोस्वामी यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये टाईम्स नाऊ वृत्तवाहिनीला रामराम केला. मी सहा महिन्यांत माझी नवी वाहिनी सुरू करेन, असं आव्हान गोस्वामींनी टाईम्स नाऊमधून बाहेर पडताना जैन यांना दिलं होतं. एखादी वाहिनी सुरू करण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागतो. पण गोस्वामी यांनी ६ महिन्यांत वाहिनी सुरू करता यावी यासाठी अन्वय नाईक यांच्यामागे स्टुडियोचं काम लवकर पूर्ण करण्याचा तगादा लावला. अन्वय यांना ६ महिन्यांत काम पूर्ण न करता आल्यानं अर्णब यांनी त्यांच्याकडे असलेलं काम काढून घेतलं. त्यांना स्टुडिओच्या परिसरात येण्यासही मज्जाव केला. यानंतर गोस्वामींनी स्टुडिओचं काम कोलकात्यातील एका इंटिरियर डिझाईनरकडून पूर्ण करून घेतलं, अशी माहिती सुत्रांनी दिली.पोलीस तपासातून काय समोर आलं?२०१८ मध्ये अन्वय आणि त्यांची आई कुमूद यांचे मृतदेह रायगडमधील काविर गावी आढळून आले. अन्वय यांचा मृतदेह घराच्या पहिल्या मजल्यावर लटकलेल्या स्थितीत सापडला. तर कुमूद यांचा मृतदेह  तळमजल्यावर आढळला. अन्वय यांच्यावर डोक्यावर मोठं कर्ज होतं आणि त्यांना कंत्राटदारांची देणी देणं कठीण जात होतं, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली.या प्रकरणात अलिबाग पोलिसांनी २०१८ मध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र २०१९ मध्ये पोलिसांनी प्रकरणाची फाईल बंद केली. यानंतर अन्वय यांच्या मुलीनं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर देशमुखांनी प्रकरणाच्या सीआयडी चौकशीचे आदेश दिले. देशमुख यांनी मे महिन्यात ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली होती.अन्वय यांच्या पत्नी अक्षता यांनी ऑगस्टमध्ये ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत गोस्वामी यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली. 'अर्णब गोस्वामी सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरून आरडाओरड करत आहेत. पण गोस्वामी यांच्यामुळे आत्महत्या केलेल्या माझ्या पती आणि त्यांच्या आईचं काय? आमच्या कुटुंबाला न्याय कधी मिळणार? या प्रकरणात आतापर्यंत कोणतीही कारवाई का झाली नाही?,' असे प्रश्न अक्षता यांनी विचारले होते.

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीAnvay Naikअन्वय नाईकSupreme Courtसर्वोच्च न्यायालय