शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

कळंबोलीमधील एमटीएनएलच्या पडीक इमारतींना आले खंडराचे स्वरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 23:24 IST

परिसरातील रहिवाशांना त्रास; साप, विंचवांचा वाढला उपद्रव

अरुणकुमार मेहत्रे

कळंबोली : कळंबोली वसाहतीत सेक्टर - १० येथील महानगर टेलिफोन निगमच्या इमारती मागील १२ वर्षांपासून ओस पडल्या आहेत. वापर नसल्याने या इमारती खंडर बनल्या आहेत. झाडे व झुडपे वाढली आहेत, त्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला आहे. विशेष म्हणजे, मागील अनेक वर्षांपासून या इमारती दुर्लक्षित राहिल्याने त्याचा ताबा गर्दुल्ले आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी घेतला आहे. यासंदर्भात स्थानिक रहिवाशांच्या अनेक तक्रारी असूनही संबंधित विभागाकडून कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही.

सिडकोने सुरुवातीला कळंबोली वसाहत विकसित केली. त्यामध्ये विविध नियोजनाच्या माध्यमातून नागरिकांना स्वस्तात घरे देण्यात आली. त्याचबरोबर गृहनिर्माण संस्थांनाही आरक्षित भूखंड देण्यात आले. त्यावर रो-हाउसेस व छोटेखणी बंगले उभारले. हे करीत असताना आवश्यक पायाभूत सुविधांची पूर्तता मात्र त्या प्रमाणात झाली नाही. चाकरमान्यांसह विविध खासगी व शासकीय प्राधिकरणातील नोकरदारांनी मोर्चा कळंबोलीकडे वळविला. सेक्टर -१० मध्ये एमटीएनएलच्या एकूण सहा इमारती आहेत.

या सहा इमारतीत एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांसाठी ९६ सदनिका आहेत. या सदनिका मागील अनेक वर्र्षांपासून वापराविना पडून आहेत. पायाभूत सुविधांची कमतरता असल्याने येथील अनेक कर्मचारी स्वत:च्या घरात स्थलांतरित झाले आहेत. या इमारतींची पडझड सुरू झाली आहे. २००५ मध्ये आलेल्या महापुराचा मोठा फटका या इमारतींना बसला. सध्या या इमारती धोकादायक बनल्या आहेत. इमारतीच्या आवारात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे.

साप व इतर सरपटणाºया प्राण्यांचा वावर वाढल्याने परिसरातील इमारतीत राहणाºया रहिवाशांना याचा ताप झाला आहे. या निर्मनुष्य इमारतींचा ताबा गर्दुल्ले आणि असामाजिक घटकांनी घेतल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर रासपचे जिल्हाध्यक्ष विकास वाक्षे यांनी यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली असून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

गर्दुल्ल्यांचा वावर वाढलाइमारतीत कोणीही राहत नसल्यामुळे येथे गर्दुल्ल्यांचा वावर वाढला आहे, तसेच रात्रीच्या वेळी रहिवाशांना यांचा त्रास होत आहे. मोडकळीस आलेल्या सोसायटीस संरक्षण भिंत आहे. गेटही कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे; परंतु इमारतीच्या बाजूला असलेली संरक्षण भिंत तोडण्यात आली आहे. तेथूनच या इमारतीत प्रवेश केला जातो. याचबरोबर इमारतीभोवती मोठ्या प्रमाणात झाडे असल्यामुळे रात्रीच्या वेळी काळोख असतो. तसेच काही प्रमाणात या परिसरातील रोडवरील पथदिवे बंद असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.