शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

गोवा महामार्गासाठी आणखी एक डेडलाइन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 00:05 IST

मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी एक डेडलाइन सरकारने दिली आहे.

पाली : मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी एक डेडलाइन सरकारने दिली आहे. जून २०२० पर्यंत या महामार्गाचा पहिला टप्पा पूर्ण होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. यापूर्वीही सरकारने २०१४ पासून चार वेळा अशाप्रकारे डेडलाइन दिली होती.मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण रखडल्यामुळे रायगडकरांचे हाल होत आहेत. वाहतूककोंडी, अपघात आणि खड्ड्यांमुळे नागरिक हैराण आहेत. त्यामुळे या महामार्गाचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार? असा तारांकित प्रश्न पेणचे आमदार रवींद्र पाटील यांनी विचारला होता. पनवेल ते इंदापूर या ८४ किलोमीटर लांबीच्या टप्प्यात एकूण २७ ठिकाणी अंडर पासेस असून, वाशी नाका व इतर जोडरस्त्यांवर जंक्शन विकास करण्यात येत आहे. खारपाडा ते कोलाडदरम्यान सब वे व सर्व्हिस रोड करणे, ही कामे मूळ मंजूर करारनाम्याव्यतिरिक्त असल्याने सद्य:स्थितीत या भागातील रखडलेले मंजूर चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर हे कामे विशेष मंजुरीने करण्याचे प्रस्तावित असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.पनवेल ते इंदापूर चौपदरीकरणाच्या कामाची मुदत जून २०१४ पर्यंत होती. मात्र, विविध कारणांमुळे हा प्रकल्प रखडला होता. ५४० कोटींची आर्थिक मदत मंजूर करण्यात आल्यानंतर २०१७ पासून हे काम सुरू करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत ७९ टक्के काम झाले आहे. त्यानुसार ८४ कि.मी. लांबीपैकी ५१ कि.मी.चे डीबीएम लेवलपर्यंतचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम जून २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे प्रकल्प संचालकांनी कळविले आहे. जून २०२० पर्यंत २५० कि.मी. व मार्च २०२१ पर्यंत उर्वरित सर्व कामासह ३६६ कि.मी. काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी लेखी उत्तरात दिली आहे.