शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेहाच्या विल्हेवाटीसाठी मित्रांला मदत करणाऱ्या दुसऱ्या आरोपीला अटक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 02:06 IST

चिरनेर -दिघाटी रस्त्याच्या बाजूला आठदहा दिवसांपूर्वी अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला होता. छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह सापडल्यानंतर उरण पोलिसांनी शिताफीने तपास करून २४ तासातच महिलेच्या खुनाचा छडा लावला आहे.

 मधुकर ठाकूर -

उरण :  प्रेयसीच्या हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीला मदत करणाऱ्या दिघोडे-उरण येथील चायनीजच्या गाडीवर काम करणाऱ्या सोहेल इस्माईल खान (१९) या तरुणाला उरण पोलिसांनी अटक केली आहे.

 चिरनेर -दिघाटी रस्त्याच्या बाजूला आठदहा दिवसांपूर्वी अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला होता. छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह सापडल्यानंतर उरण पोलिसांनी शिताफीने तपास करून २४ तासातच महिलेच्या खुनाचा छडा लावला आहे.मानखुर्द येथील घरकाम करणाऱ्या पुनम चंद्रकांत क्षिरसागर (२७) या अविवाहित महिलेचा विवाहित प्रियकर निझामउद्दीन अली (२८) यानेच तिचा टॅक्सीतच गळा दाबून खून केला.प्रेयसी पुनमचा मृतदेह त्याने  टॅक्सीतूनच दिघोडे-उरण येथे आणला.

उरण परिसरात अधुनमधून टॅक्सीचे भाडे घेऊन आल्यावर निझामउद्दीन नेहमी आपल्या मुळ गावातल्या व सध्या दिघोडे नाक्यावर चायनीज फूडच्या टपरीवर काम करणाऱ्या सोहेलकडे खानपान करीत असायचा.त्यामुळे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याची मदत घेण्याचे ठरवूनच तो मृतदेह टॅक्सीतून दिघोड्यापर्यत घेऊन आला होता. सोहेलही मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तयार झाला. त्यानेच दाखविलेल्या चिरनेर -दिघाटी रस्त्याच्या कडेला मृतदेह टाकून देऊन दोघांनी पळपोलिस तपासणीत पुनमच्या हत्येत त्याचा कोणताही सहभाग नसला तरी आरोपीला मृतदेहाची विल्हेवाटीसाठी मदत करणे, पुरावा नष्ट करणे, गुन्ह्याची माहिती दडवून ठेवल्याच्या आरोपाखाली सोहेलला अटक करण्यात आली असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली. 

टॅग्स :RaigadरायगडCrime Newsगुन्हेगारी