अलिबाग : अलिबाग नगरपरिषदेच्या आठ प्रभागातील १७ नगरसेवकांच्या जागांकरीता नेहा जाधव या बालीकेच्या हस्ते चिठ्ठी काढून करण्यात आलेल्या आरक्षण सोडती नूसार १७ जागांपैकी ८ जागी सर्वसाधारण आरक्षण आले तर ९ जागी महिलांना संधी प्राप्त झाली आहे.अलिबाग न.पा.च्या प्रभाग क्र.१ मध्ये अ- अनूसुचित जमाती महिला तर ब-सर्वसाधारण , प्रभाग क्र.२ मध्ये अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामाप्र) महिला तर ब-सर्वसाधारण, प्रभाग क्र.३ मध्ये अ-नामाप्र सर्वसाधारण तर ब सर्वसाधारम महिला, प्रभाग क्र.४ मध्ये नामाप्र सर्वसाधारण तर ब-सर्वसाधारण, प्रभाग क्र.५ मध्ये अ-अनूसुचित जाती राखीव सर्वसाधारण तर ब-सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र.६ मध्ये अ-नामाप्र महिला तर ब- सर्वसाधारण, प्रभाग क्र.७ मध्ये अ-सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. (वार्ताहर)
जिल्ह्यात नगर परिषदांची आरक्षणे जाहीर
By admin | Updated: July 3, 2016 03:07 IST