शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

जिल्ह्यात मदतीची घोषणा वाऱ्यावरच; रिक्षाचालकांना दीड हजार कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 10:38 IST

प्रवासी नसल्याने दिवसभराचा प्रवास खर्चही निघत नाही. त्यामुळे घरखर्च भागविणेही अवघड होऊन बसले आहे. सरकारने रिक्षाचालकांसाठी दीड हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. वास्तविक पाहता ही मदत तुटपुंजी आहे.

निखिल म्हात्रे -अलिबाग :  मागील १४ महिन्यांपासून कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव असल्याने रिक्षाचालकांचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे कर्जाचे हप्ते थकले असून, त्यांना कुटुंब चालविणे अवघड झाले आहे. सरकारने रिक्षाचालकांना दीड हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली. परंतु, अद्याप एकाही चालकास शासनाकडून मदत उपलब्ध झालेली नाही. तसेच लिंकही सुरू होत नाही. रायगड जिल्ह्यात तीन आसनी रिक्षा सुमारे ११ हजार आहेत, तर विक्रम मिनिडोर रिक्षा सुमारे १८ हजार आहेत. या रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून तब्बल ३५ हजार कुटुंबांमधील एक लाख ४० हजार जणांचा उदरनिर्वाह चालतो. गतवर्षी कोरोनाच्या टाळेबंदीमध्ये या सर्व रिक्षा तब्बल सहा महिने बंदच होत्या. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न रिक्षाचालक आणि मालकांपुढे उभा राहिला आहे. सध्या रिक्षा व्यवसायास परवानगी असली तरी इतर बाजारपेठा बंद असल्यामुळे रिक्षाने प्रवास करणाऱ्यांची संख्या घटली आहे. रिक्षाचालकांना तासनतास स्टँडवर प्रवाशांची वाट पाहावी लागत आहे.प्रवासी नसल्याने दिवसभराचा प्रवास खर्चही निघत नाही. त्यामुळे घरखर्च भागविणेही अवघड होऊन बसले आहे. सरकारने रिक्षाचालकांसाठी दीड हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. वास्तविक पाहता ही मदत तुटपुंजी आहे. परंतु, महिना झाला तरी तीही मिळत नाही.

जिल्ह्यातील परवानाधारक रिक्षाचालकांची संख्या - ११०००.लिंक सुरूच होत नाही -आज चार आठवडे उलटून गेले तरी रिक्षाचालकास सरकारने जाहीर केलेली मदत अद्याप मिळालेली नाही. सरकारने नोंदणीसाठी लिंक दिली आहे. मात्र, अद्याप ती लिंक सुरूच नसल्यामुळे नोंदणी होत नाही.- विजय पाटील, विक्रम मिनिडोर रिक्षा चालक मालक संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष.

कोरोनामुळे रिक्षाचालकाला विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरकारने चालकांसाठी मदतीची फक्त घोषणा केली आहे. परंतु, अद्याप एकाही रिक्षाचालकास प्रत्यक्षात मदत मिळाली नाही. - अशोक पाटील, रिक्षाचालक.

गेल्या काही दिवसांपासून प्रवासी नसल्याने घरी परतताना रिकाम्या हाती परतावे लागत आहे. त्यामुळे घरभाडे, घरखर्च कसा भागवायचा याचा मेळ लागत नाही. त्यामुळे सरकारने जाहीर केलेली मदत लवकरच मिळावी, अशी अपेक्षा आहे.- प्रज्ञील मगर. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस