शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

बेरोजगारांची गीतेंनी चेष्टा केल्याची संतप्त भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 02:07 IST

३३ मिनिटांचा प्रवास । एसटीच्या लाल डब्यात बसून ‘लोकमत’ प्रतिनिधीने जाणून घेतले जनतेचे ‘मत’

अलिबाग ते पेण 30 किमी

आविष्कार देसाई

अलिबाग : रायगड लोकसभा मतदार संघामध्ये शिवसेनेचे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री खासदार अनंत गीते यांनी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात दोन पेपर इंडस्ट्री आणणार असल्याचे सांगितले होते, त्याचे काय झाले? असा प्रश्न आता जनता विचारत आहे. त्या कंपन्यांच्या माध्यमातून २० हजार प्रत्यक्ष आणि अन्य ३० हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. आज साडेचार वर्षे होऊन गेली आहेत, प्रत्यक्षात काहीच दिसत नाही. त्यामुळे आस लावून बसलेल्या बेरोजगारांची गीतेंनी चेष्टा केल्याची संतप्त भावना पेण-दादर येथील हसुराम ठाकूर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

आघाडी सरकारने काहीच केले नाही म्हणून मतदारांनी त्यांना सत्तेतून खाली खेचले आणि सत्ता भाजप-शिवसेनेला बहाल केली. आता त्यांच्या हिशेबाची वेळ आली आहे, असे अलिबाग येथील अमोल बुरुमकर यांनी स्पष्ट केले. अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. मात्र, तेथे मेडिकल कॉलेज नाही, चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा नाहीत. चांगले रस्ते नाहीत, शिक्षणाच्या संधी अल्प आहेत, त्या निर्माण करणे गरजेचे असल्याची मागणी पेझारीचे करुणानंद पाटील यांनी केली. जिल्ह्यातील मुख्य रस्त्यांबरोबरच गावागावांतील रस्ते सुसज्य आणि खड्डेविरहित झाले पाहिजेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र, मोठी धरणे निर्माण झाली नाहीत. अस्तित्वातील धरणांची वेळेवर देखभाल दुरुस्ती झाली पाहिजे, कंपन्या उभारून रोजगार निर्माण झाला पाहिजे, असे बेलोशी-अलिबागचे सुधाकर भोपी यांनी सांगितले.

भाजप सरकारने प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये आणि दरवर्षी दोन कोटी रोजगार देणार असल्याचे जाहीर केले होते. भाजप सरकार केवळ जुमलेबाजी करून सत्तेवर आले होते. आता त्यांच्या फसव्या आश्वासनांना आम्ही बळी पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी कोकणाचा कायापालट केला होता. त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण केला असता, तर कोकण आज जगाच्या नकाशावर असता. अंतुले यांचे चिरंजीव नावीद यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाबाबत ठाकूर यांना विचारले असता ठाकूर म्हणाले, नावीद यांचा निर्णय साफ चुकीचा आहे. शिवसेनेत त्यांचा वापर झाल्यानंतर त्यांना दूर केले जाईल.निवडून येणाऱ्या उमेदवारांनी आपल्या मतदार संघाचा विकास केला पाहिजे. अलिबागमधील प्रस्तावित कंपन्यांना ऊर्जितावस्था दिली पाहिजे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, असे स्पष्ट मत अलिबागच्या वैभव ढोरे यांनी मांडले.रोजगाराचा प्रश्न सोडवावाच्भाजप सरकारने प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये आणि दरवर्षी दोन कोटी रोजगार देणार असल्याचे जाहीर केले होते, आता त्यांच्या फसव्या आश्वासनांना मतदार बळी पडणार नाहीत. रायगड लोकसभा मतदारसंघातील रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी कंपन्यांची उभारणी करावी. चांगल्या आरोग्य सुविधा निर्माण करून गोरगरिबांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे, असे एकं दर प्रवाशांनी अलिबाग ते पेण ३० किमी प्रवासादरम्यान व्यक्त के ले.

टॅग्स :Anant Geeteअनंत गीतेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक