शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
2
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
4
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
5
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
6
USA vs CAN : वर्ल्ड कपचा श्रीगणेशा! कॅनडा विरूद्ध अमेरिका म्हणजे IND vs PAK, जाणून घ्या कारण
7
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
8
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
9
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
10
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
11
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
12
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
13
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
14
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
15
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
16
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर
17
‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला
18
‘एअर टर्ब्युलन्स’ची माहिती मिळणार, प्रवासी सुरक्षेसाठी विशेष सॉफ्टवेअरची ‘इंडिगो’कडून चाचणी
19
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
20
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर

अमूर फाल्कन अलिबागमध्ये, ४४ हजार किमीचा अमूरलंँड ते द.आफ्रिका प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 12:04 AM

चीन आणि रशिया सीमेवरील अमूरलँड क्षेत्रातील मांसाहारी गटात मोडणारा ‘अमूर फाल्कन’ हे प्रवासी पक्षी अमूरलँड ते दक्षिण आफ्रिका हा तब्बल ४४ हजार किमी अंतराचा अनोखा प्रवास अलिबागमार्गे करीत

जयंत धुळप अलिबाग : चीन आणि रशिया सीमेवरील अमूरलँड क्षेत्रातील मांसाहारी गटात मोडणारा ‘अमूर फाल्कन’ हे प्रवासी पक्षी अमूरलँड ते दक्षिण आफ्रिका हा तब्बल ४४ हजार किमी अंतराचा अनोखा प्रवास अलिबागमार्गे करीत असल्याची माहिती पक्षी अभ्यासक डॉ.वैभव देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.अमूर फाल्कन या पक्ष्याची प्रवासी क्षमता आश्चर्यकारक अशीच आहे. अमूर लँडमधील त्याच्या वास्तव्यामुळेच त्यास अमूर फाल्कन असे म्हटले जाते. हे फाल्कन चीनमधून उत्तरपूर्व नागालँड मार्गे भारतीय द्वीपकल्पांमध्ये प्रवेश करतात. भारताच्या पश्चिमेकडील खोºयातून भारत ओलांडून दक्षिण आफ्रिकेकडे जाताना नोव्हेंबर महिन्यात ते अलिबागमध्ये काही दिवस वास्तव्यास असतात. आफ्रिकेतून ते अफगाणिस्तानातून हिमालय पार करून मूळ अमूरलँडमध्ये पोहोचत असल्याचे डॉ.देशमुख यांनी सांगितले.गेल्या १५ वर्षांत अमूर फाल्कनची अलिबाग परिसरातील वास्तव्य संख्या सतत वाढत असून, यंदा सर्वाधिक म्हणजे एक हजार अमूर फाल्कनची नोंद झाली असल्याचे डॉ.देशमुख यांनी सांगितले.अमूर फाल्कन हे मांसभक्षक पक्षी आहेत, त्यांना अलिबाग परिसरात त्यांचे खाणे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असावे, परिणामी त्यांची येथे येण्याची संख्या वृद्धिंगत झाली असावी असा निष्कर्ष डॉ.देशमुख यांनी काढला आहे.