शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नवाबकालीन शाळेसाठी माजी विद्यार्थी सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:52 IST

विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; नगरपंचायतीचे कार्यालय उभारणार

- अरुण जंगम म्हसळा : म्हसळा शहरातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा म्हसळा नं. १ च्या विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढून, त्या जागी आलिशान नगरपंचायत कार्यालय बांधण्याचा घाट नगरसेवकांनी बांधला आहे. विशेष म्हणजे, शाळेबद्दल जिल्हा परिषदेकडून दोन दिवसांत ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येईल, असे जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे यांनी नुकतेच जाहीर केल्याने शाळेचे माजी विद्यार्थी संतापले असून, आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.म्हसळा शहरातील शाळा नं.१ ची नवाबकालीन इमारत जमीनदोस्त करून, या जागी नगरपंचायतीचे आलिशान कार्यालय बांधण्यासाठीचा प्रस्ताव दीड-दोन वर्षांपूर्वी नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला होता. या वेळी माजी विद्यार्थी आणि नगरसेवकांमध्ये झालेला वाद सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी मध्यस्थीने सोडवला होता.म्हसळा शहरात अनेक ऐतिहासिक इमारती आहेत. त्यापैकी मराठी मुलांची शाळा हीसुद्धा एक आहे. म्हसळा शहरातील व तालुक्यातील नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी तत्कालीन नवाबाने अनेक शासकीय इमारती बांधल्या होत्या. यातील प्रत्येक इमारत बांधण्यामागे एक विशिष्ट उद्देश होता. आज शहरात रा.जि.प. उर्दू शाळा, अंजुमन हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा, शाईन उर्दू यांच्यासहित अनेक खासगी शाळा गेल्या अनेक वर्षांत सुरू झाल्या असल्या तरी म्हसळा नं. १ ची पटसंख्या १५५ इतकी आहे.शिक्षकांच्या उत्तम अध्यापनामुळे ही शाळा शिक्षण विभागाच्या तपासणीत गुणवत्ता श्रेणी ‘अ’मध्ये सलग चार वर्षे राहिली आहे. तसेच रा.जि.प.ची प्राथमिक सेमी इंग्रजी माध्यमाची ‘अ’ श्रेणीतील तालुक्यातील ही एकमेव शाळा आहे. यामुळेच म्हसळा शहरातील पालकांसोबत आजूबाजूच्या खेडेगावातील पालकांची आपल्या पाल्यासाठी या शाळेला विशेष पसंती आहे. वर्षागणिक या शाळेचा पट वाढतच आहे; परंतु या शाळेत शिकणाऱ्या व नव्याने प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांचा विचार न करता, म्हसळा नगरपंचायतच्या नगराध्याक्षासहित सर्वच नगरसेवकांनी ही वास्तू जमीनदोस्त करून नगरपंचायतची इमारत बांधण्याचा अट्टाहास चालवला आहे.म्हसळा हिंदू स्मशानभूमीच्या भूमिपूजन कार्यक्र माप्रसंगी सुनील तटकरे यांनी, शाळेच्या जागी नगरपंचायत कार्यालय बांधण्यासाठी लागणारे जिल्हा परिषदेचे ना हरकत प्रमाणपत्र विद्यमान जि.प. अध्यक्षा अदिती तटकरे यांना सांगून, येत्या दोन दिवसांत देणार असल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना वाºयावर सोडून कार्यालय बांधण्याची घाई प्रशासनासह नगरसेवकांना लागली आहे. त्यामुळे पालकांसह माजी विद्यार्थी आंदोलन करणार असल्याचे माजी विद्यार्थी सचिन कमलाकर करडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी