शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग: दहावी निकालातही रायगडच मुंबई विभागात अव्वल; दहावीचा ९६.७५ टक्के निकाल, मुलीच सरस

By राजेश भोस्तेकर | Updated: May 27, 2024 14:58 IST

मागील वर्षाच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले

राजेश भोस्तेकर अलिबाग  : विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या दहावी परिक्षेचा निकाल‌ सोमवारी २७ मे रोजी ऑनलाईन जाहिर करण्यात आला. रायगड विभाग हा मुंबई विभागात पुन्हा अव्वल ठरला आहे. रायगडचा निकाल ९६.७५ टक्के लागला असून यंदा १.४७ टक्क्याने वाढ झाली आहे. यंदाच्या निकालात रायगडाच्या मुलीचं मुलापेक्षा निकालात भारी पडल्या आहे. दहावीच्या परीक्षेत ९५.८७ टक्के मुले, तर ९७.६५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यंदा उत्तीर्ण होण्यात मुलीचा टक्का ०.९७ टक्क्यांनी वाढला आहे. तर मुलांचा १.८८ टक्क्यांनी वाढला आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च, २०२४ मध्ये इयत्ता दहावीची परिक्षा घेण्यात आली होती. दहावीच्या निकालाकडे विद्यार्थी तसेच पालकांचे लक्ष लागले होते. या परिक्षेचा निकाल सोमवारी २७ मे रोजी मंडळाच्या संकेतस्थळांवर दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. दहावीच्या परिक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून ३५ हजार ९१३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी ३५ हजार ७२७ विद्यार्थी परिक्षेला सामोरे गेले.‌ निकालात १७ हजार ३४१ मुले, १७ हजार २२७ मुली असे एकूण ३४ हजार ५६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, १ हजार १५९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९६.७५ टक्के इतके आहे. 

५४.३५ टक्के पुर्नपरिक्षार्थी उत्तीर्ण

रायगड जिल्ह्यातील ५४७ पुर्नपरिक्षार्थी विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. यामधील ५३९ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी २९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, २४५ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. पुर्नपरिक्षार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ५४.३५ टक्के इतके आहे.८९ टक्के खाजगी विद्यार्थी उत्तीर्ण

रायगड विभागात १०१६ विद्यार्थी यांनी १७ नंबर अर्ज दहावी परीक्षेसाठी भरला होता. ९८२ विद्यार्थ्यानी परीक्षा दिली होती. यापैकी ८७४ विद्यार्थी हे बाहेरून परीक्षेला बसून उत्तीर्ण झाले आहेत. ८९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

निकालात मुलींचीच बाजी

प्रवर्ग     परीक्षा अर्ज   परिक्षेला सामोरे गेलेले   उत्तीर्ण          टक्केमुले      १८१९४                १८०८७                   १७३४१        ९५.८७मुली     १७७१९               १७६४०                   १७२२७        ९७.६५एकूण   ३५९१३               ३५७२७                  ३४५६८       ९६.७५ 

तालुकानिहाय दहावी निकाल 

तालुका - टक्केपनवेल - ९७.७६उरण - ९६.५६कर्जत - ९४.९७खालापूर - ९४.५४सुधागड - ९२.५९पेण - ९६.६९अलिबाग - ९६.८१मुरुड - ९५.९९रोहा - ९६.५४माणगाव - ९७.६८तळा - ९५.५४श्रीवर्धन - ९६.२९म्हसळा - ९७.५६महाड - ९७.५८पोलादपूर - ९६.९४

टॅग्स :ssc examदहावी