शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना काेराेनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 19:18 IST

10 दिवस राहणार हाेम आयसाेलेशनमध्ये

ठळक मुद्देअलिबागचे आमदार दळवी यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आज (७ सप्टेंबर) ते मुंबईत सुरु होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनाकरिता निघाले होते.

रायगड - अलिबागमतदार संघातील शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची कोव्हिड-१९ चाचणी साेमवारी पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करुन स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार दळवी यांनी केले आहे. अलिबाग तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत चालला आहे.  6 सप्टेंबरपर्यंत अलिबाग तालुक्यातील काेराेना रुग्णांची एकूण संख्या दाेन हजार 604 वर पाेचली आहे, तर 67 रुग्णांचा काेराेनामुळे अंत झाला आहे.

अलिबागमध्ये दिवसाला किमान 100 रुग्ण सापडत असल्याने सर्वांमध्येचे चिंतेचे वातावरण पसरले आहे. अनलाॅकनंतर सर्वत्र व्यवहार सुरळीत सुरु झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गर्दी दिसत आहे. काेराेना जगातून नाहीसा झाला आहे असाच समज करुन नागरिकांनी घेतला असल्याचे हाेणाऱ्या गर्दी वरुन दिसून येते. परिणामी काेराेना रुग्णांची वाढ झपाट्याने वाढत आहे.

काहीच दिवसांपूर्वी प्रसिध्द बिल्डर प्रताप गंभीर यांचा काेराेनाच्या संसर्गाने मृत्यू झाला हाेता. त्याचप्रमाणे आतापर्यंत अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, प्रसिध्द उद्याेजक सत्यजीत दळी, अलिबाग राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष दत्ता ढवळे, शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्यासह अन्य विविध राजकीय नेत्यांना, अधिकारी, डाॅक्टर, पाेलिस अधिकारी, पत्रकार यांना काेराेनाची लागण हाेऊन गेली आहे. हे सर्व चित्र डाेळ्यासमाेर असतानाही नागरिक याच्यामधून धडा घेताना दिसत नसल्याने आर्श्र्चय व्यक्त करण्यात येत आहे.

अलिबागचे आमदार दळवी यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आज (७ सप्टेंबर) ते मुंबईत सुरु होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनाकरिता निघाले होते. धरमतर येथे पोहोचल्यावर त्यांना त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तेथूनच ते माघारी फिरले आणि क्वारंटाईन झाले आहेत. पुढचे १० दिवस ते होम क्वारंटाईन राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जे कोणी आ.दळवी यांच्या संपर्कात आले असतील त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करुन घ्यावी, स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन आ. महेंद्र दळवी यांनी केले आहे. 

टॅग्स :MLAआमदारalibaugअलिबागcorona virusकोरोना वायरस बातम्या