शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागमध्ये एकाच रात्रीत चार घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 02:08 IST

तालुक्यातील हाशिवरे-रेवस पट्ट्यातील गावांमध्ये रविवारची रात्र हादरवणारी ठरली. चोरट्यांनी सलग चार घरे फोडून लाखो रुपयांची रोकड आणि लाखो रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. पोयनाड हद्दीतील ज्वेलरीचे दुकान फोडून तेथील चांदीच्या दागिन्यांची चोरी केली. या घटनेने गावांतील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

अलिबाग : तालुक्यातील हाशिवरे-रेवस पट्ट्यातील गावांमध्ये रविवारची रात्र हादरवणारी ठरली. चोरट्यांनी सलग चार घरे फोडून लाखो रुपयांची रोकड आणि लाखो रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. पोयनाड हद्दीतील ज्वेलरीचे दुकान फोडून तेथील चांदीच्या दागिन्यांची चोरी केली. या घटनेने गावांतील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांनी शहराकडील मोर्चा वळवून आता थेट ग्रामीण भागांना लक्ष्य केल्याने शहरांबरोबरच ग्रामीण भागही सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. मांडवा पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.शहरी भागांमध्ये चोरट्यांचा असणारा धुमाकूळ आता ग्रामीण भागाकडे वळला असल्याने पोलिसांसमोर पुन्हा एकदा आव्हान उभे राहिले आहे. सध्या हिवाळा सुरु असल्याने कडाक्याची थंडी पडली आहे. चोरट्यांनी याचाच फायदा घेत घरफोडीचा प्लॅन सहज पूर्ण केला आहे. रविवारी रात्री जगन्नाथ पाटील यांच्या घरात शिरुन चोरट्यांनी कपाटातील १० हजार रुपये आणि तब्बल ११ तोळे सोने चोरले. अलिबाग तालुका पंचायत समितीचे माजी सभापती अनिल गोमा पाटील यांच्या घरातही चोरट्यांनी हात साफ केला आहे. पाटील यांच्या घरातील सर्वजण कार्यक्रमानिमित्त बाहेर गेले होते. तसेच पाटील यांच्या अन्य दोन भावांच्या घरातही चोरी केली. चोरट्यांनी घराचे कडीकोयंडा उचकटून त्यांच्या घरात प्रवेश केला. पाटील यांच्यासह त्यांच्या भावाच्या घरातील ५० हजार रोख, १३ सोन्याच्या अंगठ्या किंमत ९० हजार रुपये, कानातील सोन्याचे तीन जोड २० हजार रुपये किमतीचे, एक तोळे सोने, १० हजार रुपये किमतीची दोन घड्याळे, सुरेंद्र पाटील यांच्या घरातील दोन हजार रुपये आणि अनिल यांचे मोठे बंधू जगन्नाथ पाटील यांच्या घरातील दोन लाख १० हजार किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेले. त्याचप्रमाणे फुफादेवीचा पाडा येथील बंद घरातील लाखो रुपयांचे दागिने चोरट्यांनी लांबविले आहेत.पोयनाड पोलीस ठाणे हद्दीतील सौभाग्य ज्वेलर्सही चोरट्यांनी फोडले आहे. त्या दुकानातील चांदी मोठ्या प्रमाणात चोरली आहे. सोने ज्या तिजोरीत ठेवण्यात आले होते त्याचे लॉक भक्कम असल्याने चोरट्यांना ते तोडता आले नाही.पोलिसांचा वचक राहिला नाहीजिल्ह्यात गेल्यावर्षी तब्बल २३२ घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. त्यातील ७० गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. यावर्षीही घरफोडीचा आलेख वाढत असल्याने पोलिसांचा वचक कमी तर झाला नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.ग्रामीण भागाकडे चोरट्यांचा मोर्चा -जिल्ह्यामध्ये चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. जिल्ह्याच्या शहरी भागांमध्ये सातत्याने चोरीच्या घटना घडतात. मात्र ग्रामीण भागामध्ये त्याचे प्रमाण कमी होते. चोरट्यांनी आता आपला मोर्चा ग्रामीण भागांकडे वळवला आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. चोरट्यांना पकडण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे. लवकरच त्यांना गजाआड केले जाईल, असे सहायक पोलीस निरीक्षक एम.आर.बुरांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.अनिल गोमा पाटील यांच्या घरापासून काही अंतरावर दारुच्या बाटल्या आणि काही पदार्थ पडल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे चोरट्यांनी चांगलीच जंगी पार्टी केली असावी अथवा त्यांचे काही साथीदार तेथे थांबले असावेत, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. चोरीमागे मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा