शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सारा ठाकूर मृत्यूप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2023 15:23 IST

जिते गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनुपस्थिती भोवली

अलिबाग : पेणमधील जिते येथील सारा ठाकूर या १२ वर्षीय मुलीला मण्यार सापाने दंश केल्याची घटना २६ जुलै रोजी घडली होती. प्राथमिक उपचार न मिळाल्याने सारा हिचा मृत्यू झाल्याचा आरोप केला गेला होता. आरोग्य विभागाने केलेल्या चौकशीत त्या दिवशी जिते प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी मिलिंद पाटील हे हजर नसल्याचे स्पष्ट झाले.

साराला प्राथमिक उपचार वेळेवर  न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्यासंबंधात जिते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्यालयी अनुपस्थित वैद्यकीय अधिकारी मिलिंद पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव राष्ट्रीय आरोग्य अभियानचे आरोग्यसेवा संचालक आयुक्त यांच्याकडे सादर केला आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी सांगितले.

सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी मुख्यालयी उपस्थित असणे गरजेचे आहे. यापुढे मी स्वतः प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देणार असून, या भेटीवेळी जे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच बालकांचे लसीकरण करण्यापूर्वी सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांचे योग्य पर्यवेक्षण करावे.- डॉ. भरत बास्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद.

चुकीच्या लसीकरणप्रकरणी तिघे निलंबितबालकांना चुकीची लस देणाऱ्या पेण तालुक्यातील जिते प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन आरोग्य सहायक व एक आरोग्यसेवक यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. १ मे २०२३ रोजी जिते आरोग्य केंद्रात पाच बालकांना गोवर रुबेला लस द्यायची असताना तेथील कर्मचाऱ्यांनी बीसीजी लस दिली होती. संबंधित बालकांच्या शरीरावर जखमा होऊन त्यांना त्रास सहन करावा लागला. या प्रकरणी चौकशीनंतर आरोग्य सहायक विकास पाटील, प्रियांका म्हात्रे, आरोग्यसेवक कोमल पाटील या तिघांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी निलंबित केले आहे. तसेच लसीकरणप्रकरणी डॉ. मिलिंद पाटील याचे निलंबन करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. 

टॅग्स :RaigadरायगडDeathमृत्यूdoctorडॉक्टर