शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

समुद्र खवळल्याने रायगड किनारपट्टीवर सतर्कता; मॅन डौंस चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 08:36 IST

चक्रीवादळ तयार झाल्याने समुद्र खवळला असून त्याचा परिणाम हा रायगड किनारपट्टीलाही होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : ऐन थंडीत रायगडकरांना पुढील चार दिवसांत मेघगर्जनेसह मध्यम ते हलका अवकाळी पाऊस अनुभवास मिळण्याची शक्यता आहे. नैऋत्य बंगालच्या उपसागरावर मॅन डौंस हे चक्रीवादळ तयार झाल्याने समुद्र खवळला असून त्याचा परिणाम हा रायगड किनारपट्टीलाही होणार आहे. हवामान विभागाने याबाबत माहिती दिली असून जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. 

नैऋत्य बंगालच्या उपसागरावर मॅन डौंस हे चक्रीवादळ शनिवारी संध्याकाळी १० किमी प्रतितास वेगाने वायव्य दिशेला केंद्रस्थानी होते. ९ डिसेंबरपासून दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावरील पुड्डुचेरीच्या किनाऱ्यापासून वायव्येकडे सरकून ७५ ते ८५ किमी प्रतितास वेगाने उत्तर तामिळनाडू ओलांडण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस आकाश ढगाळ राहणार असल्याने रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

जिल्हाधिकारी नियंत्रण कक्षजिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांनी व नागरिकांनी सतर्क रहावे. कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी जवळच्या तहसील कार्यालय, पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाच्या ०२१४१-२२२०९७/८२७५१५२३६३  अथवा टोल फ्री क्रमांक ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रशासनाने सूचित केले आहे.

खोल समुद्रात जाऊ नकासमुद्र खवळलेल्या स्थितीत असल्याने मच्छीमारांनी मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनी पिके मळणी, कापणीसाठी तयार असतील तर पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. फळे भाजीपाला, शेत पिकांची सुरक्षित ठेवण करावी. जनावरे देखील सुरक्षित ठिकाणी बांधावीत. अतिवृष्टीमुळे सखल भागात काही प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता राहील. मेघगर्जनेसह वादळीवारे व मध्यम ते हलका पाऊस असल्याने विजा चमकण्याची व पडण्याची शक्यता आहे. गडगडाटी वाऱ्यासह पाऊस पडत असताना नागरिकांनी खुल्या व मोकळ्या भागात थांबू नये. विजेचे खांब, झाडे इ. ठिकाणी उभे राहू नये. विद्युत उपकरणांपासून दूर रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केले आहे. 

वर्तविली पावसाची शक्यताहवामानाच्या बदललेल्या परिस्थितीमुळे १० डिसेंबरपासून पुढील ४ ते ५ दिवसांमध्ये महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्याअनुषंगाने रायगड जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

टॅग्स :Raigadरायगड