शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत मनसे कार्यकर्त्यांचं अनोखं आंदोलन

By वैभव गायकर | Updated: August 22, 2022 17:14 IST

१२ वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरु आहे. अनेक सरकारे आली मात्र या रस्त्याचे काम मार्गी लागू शकले नाही.

 

वैभव गायकर

पनवेल - मागील 12 वर्षापासून पूर्ण होऊ न शकलेल्या व सध्याच्या घडीला दुरावस्था झालेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत मनसेने दि.22 रोजी पनवेल येथे आंदोलन छेडत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा निषेध केला.यावेळी मनसैनिकांनी रस्त्यावरच कोंकणात प्रसिद्ध असलेले बाळ्या नृत्य सादर केले.मनसेच्या रस्ते,साधन सुविधा आस्थापना विभागाच्या माध्यमातून हे आंदोलन पुकारण्यात आले होते.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, जिल्हा सचिव केसरीनाथ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण दळवी , तालुका अध्यक्ष रामदास पाटील, महिला जिल्हा अध्यक्ष आदिती सोनार, पनवेल महानगरपालिका शहराध्यक्ष योगेश चिले आदींसह मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पनवेल कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.रायगड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.12 वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरु आहे.अनेक सरकारे आली मात्र या रस्त्याचे काम मार्गी लागू शकले नाही.आजवर या मार्गावर तब्बल दोन हजार जणांना अपघातात आपला जीव गमवावा लागला असून जवळपास सात हजारांपेक्षा जास्त नागरिक तसेच वाहन चालक जखमी झाले आहेत.

विशेष म्हणजे नितीन गडकरी यांनी देखील या मार्गाचे काम पूर्ण करता आले नसल्याने गुडघे टेकले असल्याचा आरोप मनसेचे जिल्हा सचिव केसरीनाथ पाटील यांनी केला आहे.गणेशोत्सव तोंडावर आले असताना पुन्हा दरवर्षी प्रमाणे या मार्गावर खड्डे पडल्याने कोंकण वसायींना याचा मोठा फटका बसणारआहे .याकरिता तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केसरीनाथ पाटील यांनी यावेळी केली.

हे तर दहा तोंडी रावण मुंबई गोवा महामार्ग मृत्यूचा सापाला बनत चालला असताना सरकार असो व अधिकारी वर्ग केवळ आश्वासने आणि उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने मनसेचे खारघर शहर उपाध्यक्ष गणेश बनकर यांनी रावणाची विशेभुषा परिधान करून निषेध व्यक्त केला.

टॅग्स :MNSमनसे