शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

सात वर्षांनंतर कालव्याला आले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 03:41 IST

वाशी ते निवी विभाग झाला थंडगार : संघर्ष, आंदोलन आणि अथक प्रयत्नांना आले यश

रोहा : मागील सहा-सात वर्षे कालव्याला पाणी नव्हते. निवी, तळाघर, लांढर, वाशी पूर्ण विभागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला. तसेच गुरेढोरे, पशूपक्षी, झाडंझुडपं, पोल्ट्री, विविध शेतीला पाणी मिळाले नाही. अवघ्या परिसराला अक्षरश: वाळवंटाचे स्वरूप आले. बोअरवेल, विहिरी आटल्या. कालव्याला सुरळीत पाणी सोडावे अशी मागणी सातत्याने झाली. पण कालव्याच्या पाण्याकडे कोणी लोकप्रतिनिधींनी लक्षच दिले नाही. विभागात पाण्यासाठी संघर्ष आंदोलन उभे राहिले. पाण्यासाठी संघर्षाची धार अधिक प्रभावी बनली. तरीही सलग दोन वर्षे यश आले नाही. सर्वस्तरातून सुरु असलेले प्रयत्न, ग्रामस्थांच्या अथक संघर्षातून अखेर यशस्वी होवून कालव्याला अखेर पाणी आले आहे.कोलाड पाटबंधारेच्या आंबेवाडी ते निवी भुवनेश्वर कालव्याला पाणी सोडावे. संपूर्ण विभाग पुन्हा सुजलाम सुफलाम व्हावा अशी मागणी सातत्याने झाली. त्याआधी कालव्याचे काम पूर्ण होऊ द्यात, मग तुम्हाला अखंड पाणी मिळेल हे पाटबंधारे विभागाचे आश्वासन होते. याउलट कालवा दुरुस्तीच्या नावाखाली नको तिथे मोऱ्या, कालव्याला काँक्र ीटीकरण करण्यात आले. त्यानंतरही पाणी सोडले गेले नव्हते.या कालव्याच्या दुरूस्ती कामांत लाखोंचा गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले. लांढर, उडदवणे हद्दीतील काँक्र ीट पावसात अक्षरश: वाहून गेले. यातूनच ग्रामस्थांतून संताप व्यक्त झाला. सहा-सात वर्षे कालव्याला पाणी नाही. त्यामुळे वाशी, लांढर, बोरघर, तळाघर, निवी सर्वच गावांत पाण्यासाठी कायम संघर्ष राहिला. कालव्याला पाणी सोडा ही मागणी जोर धरू लागली. शेतकरी संघटना, वाशी, तळाघर, वरसे ग्रामपंचायत प्रशासन, लोकप्रतिनिधींनी पाण्यासाठी पाठपुरावा केला. अशात कालव्याला पाणी येणार नाही हे लक्षात येताच ग्रामस्थांनी सर्वांनाच धारेवर धरले आणि सर्वांच्याच प्रयत्नातून अखेर मंगळवारी निवी भुवनेश्वरपर्र्यंतच्या कालव्याला पाणी आले आहे. कालव्याला पाणी सोडण्यासाठी पाटबंधारेचे कार्य. अभियंता धनंजय गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता श्वेता पाटील व सर्व अभियंता, कर्मचारी यांनी अथक प्रयत्न सुरू ठेवले.तब्बल महिनाभर कालव्यातील गाळ काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू होते. त्यासाठी अद्ययावत यंत्रणा सज्ज झाली. त्यात कालव्याचे पाणी पुढे सरकताच संभे, किल्ला व अनेक ठिकाणी गळती झाली. त्यावरही अधिकाºयांनी मात केली. वाशी, लांढर, तळाघर, निवी ग्रामस्थांनी संभे ग्रामस्थांशी पाण्याबाबत चर्चा केली. त्यांनीही पाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला. अखेर मंगळवारी सकाळी कालव्याचे पाणी शेवटच्या टोकातील निवी भुवनेश्वरपर्यंत आले.कालव्याला पाणी आल्याचे दिसताच सबंध विभागात आनंदोत्सव साजरा झाला. गुरेढोरे, पशूपक्षी तृप्त झाले. बालगोपाळांनी पाण्यात भिजण्याचा आनंद लुटला. पाणी आल्याने ग्रामस्थांनी आमदार, सरपंच, अधिकाºयांचे आभार मानले. शेतकरी, पोल्ट्री व्यावसायिक समाधानी झाले. आता पूर्वीसारखे कालव्याला पाणी सुरळीत सोडले जाईल असे आश्वासन मुख्य कार्य. अधिकारी धनंजय गोडसे यांनी दिले. अभियंता श्वेता पाटील व टीमच्या प्रयत्नाचे विभागात कौतुक झाले आहे.

टॅग्स :Waterपाणी