शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांनी ती पुन्हा सौभाग्यवती; अन् मुलालाही मिळाले बाबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 10:30 IST

अलिबागच्या महिलेचा नव्याने संसार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : पूर्वी पतीच्या निधनानंतर पत्नीला संपूर्ण आयुष्य विधवा म्हणून काढावे लागत होते. रूढी परंपरांनी जखडलेले तिचे संपूर्ण आयुष्य जणू नरकच असे. तिच्यावर अनेक बंधने असत. मात्र, आता काळ बदलला आहे. विधवांचा पुनर्विवाह होतोय, त्यांनाही समाजात मानाचे स्थान मिळतेय. अशाच एका अलिबागच्या विधवा महिलेचा पुनर्विवाह झाल्याने तिचा संसार नव्याने फुलणार आहे. विशेष म्हणजे, पदरात ११ वर्षांचा मुलगा असताना, तिला पुण्यातील व्यक्तीने स्वीकारले आणि ती पुन्हा सौभाग्यवती झाली, तसेच तिच्या मुलालाही बाबा मिळाले. 

अलिबागमधील ऋतिका या विधवा महिलेशी पुण्यातील प्रतीक याने विवाह केला असून, तिच्या अकरा वर्षांच्या मुलालाही दत्तक घेतले आहे. त्यामुळे ऋतिकाचा संसार पुन्हा सुरू होणार आहे. भाजपचे रायगड उपाध्यक्ष दिलीप भोईर यांच्या पुढाकाराने हा विवाह सोहळा संपन्न झाला.  ऋतिका हिचा २०११ साली राजेश पाटील यांच्यासोबत विवाह झाला होता. त्यांना सोहम हा मुलगा झाला. मात्र, २०१५ साली राजेश जग सोडून गेले. घरची परिस्थिती बेताची असूनही तिने सोहमला शिक्षण दिले.

असे ठरले लग्न : पुण्याच्या भोसरी येथील प्रतीक महादेव भागवत याच्याशी ऋतिकाची ओळख झाली. ऋतिकाचा स्वभाव  आवडल्याने प्रतिक यांनी लग्नासाठी मागणी घातली. या दोघांचा किशोर भातखंडे यांनी  विवाह लावला. तर सोहम याला रीतसर दत्तक दिले. दोघांची रजिस्टर विवाह नोंदणी ॲड.सुनील केशव वाकडे यांनी केली.

टॅग्स :marriageलग्न