कर्जतमध्ये २० गावेविकासासाठी दत्तक; ग्रामसमृद्धी अभियानांतर्गत काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 11:54 PM2018-11-19T23:54:48+5:302018-11-19T23:58:04+5:30

महोत्सवानिमित्त जीवनविद्या मिशनच्या ग्रामसमृद्धी अभियानाअंतर्गत कर्जत तालुक्यामधील २० गावे दत्तक घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

Adoption of 20 villages in Karjat; Work under Gram Samrudhi Abhiyan | कर्जतमध्ये २० गावेविकासासाठी दत्तक; ग्रामसमृद्धी अभियानांतर्गत काम

कर्जतमध्ये २० गावेविकासासाठी दत्तक; ग्रामसमृद्धी अभियानांतर्गत काम

googlenewsNext

कर्जत : ज्ञानदान व वैचारिक क्र ांतीद्वारे समाज परिवर्तन घडवणारे थोर तत्त्वज्ञ, समाजसुधारक सद्गुरू वामनराव पै यांच्या जन्मदिनानिमित्त कर्जतमध्ये समाज प्रबोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवानिमित्त जीवनविद्या मिशनच्या ग्रामसमृद्धी अभियानाअंतर्गत कर्जत तालुक्यामधील २० गावे दत्तक घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवात अनेक मान्यवर उपस्थित होते. खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुरेश लाड व कर्जतमधील इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने या कार्यक्र माची सुरु वात झाली. सर्वच मान्यवरांनी जीवनविद्या मिशनच्या उपक्र माचे मनापासून कौतुक केले.
कार्यक्र मादरम्यान प्रल्हाद पै यांनी ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपले जीवन हे नशिबावर अवलंबून नसून ते आपल्याच हातात आहे. जीवनविद्या म्हणजे जीवन जगण्याची कला आहे. वस्तुस्थितीचा स्वीकार करून योग्य दिशेने प्रयत्न केल्यास नक्कीच प्रगती होते. आपण एकटे यशस्वी न होता आपल्यासोबत इतरांना यशस्वी केल्याने नेमके काय होते हे देखील त्यांनी अनेक मार्मिक उदाहरणे देत पटवून दिले.
महोत्सवानिमित्त जीवनविद्या मिशनच्या ग्रामसमृद्धी अभियानाअंतर्गत कर्जत तालुक्यामधील २० गावे दत्तक घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. कार्यक्र मादरम्यान संस्थेच्या या अभियानातून सहकार्य मिळविण्यासाठी कर्जतमधील वैजनाथ गावाने प्रथम पुढाकार घेतला. अभियानासाठी कर्जतमधील इतर गावांनी देखील असाच पुढाकार घेतल्यास लवकरच कर्जतचा संपूर्ण कायापालट होऊ शकेल अशी आशा निर्माण झाली आहे.

Web Title: Adoption of 20 villages in Karjat; Work under Gram Samrudhi Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड