शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापला रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाला- "त्याच्या हातातून..."
3
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
4
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
5
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
6
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
7
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
8
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
9
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
10
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
11
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
12
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
13
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
14
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
15
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
16
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
17
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
18
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
19
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
20
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर

आदगाव किनारी शार्क माशाला दिले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 00:12 IST

मच्छीमार, वनविभागाने केली सुटका ;  दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांना यश

लोकमत न्यूज नेटवर्कदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव समुद्रकिनारी आलेल्या अवाढव्य शार्क माशाला येथील वनविभाग व मच्छीमारांनी जीवदान दिल्याची घटना मंगळवारी घडली आहे. तालुक्यातील सर्वा मार्गे दिघीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत सायंकाळच्या वेळी आदगाव समुद्रामध्ये होणाऱ्या भरती - ओहोटीमुळे किनाऱ्यावर आलेल्या जवळपास दहा फुटांपेक्षा जास्त लांबीच्या अवाढव्य शार्क व्हेल माशाला पुन्हा सुखरूप  समुद्रामध्ये सोडण्यात आदगाव येथील बाळकृष्ण पावशे, मधुकर दोडकुलकर, लाया दोडकुलकर, धनेश चोगले व काशिनाथ चोगले यांसह आठ ते दहा कोळी बांधवांना दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनी यश आले आहे. श्रीवर्धनमधील भरडखोल, आरावी, दिवेआगर या समुद्रकिनाऱ्यावर मागील काळात मृत मासा सापडलेल्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, यावेळी आदगाव येथील किनाऱ्यावर आलेल्या जिवंत शार्क माशांबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी पहिल्या दिवशी किनाऱ्यालगत  सुमारे १२ ते १५ फुटांचा शार्क व्हेल मासा शरीराच्या हालचाली कमी होत असताना पाण्यात जाण्यासाठी धडपडत असल्याचे पाहावयास मिळाले. लगेचच  किनाऱ्यावरील कोळी बांधवांनी एकत्र येत त्याला पाण्यात सोडण्याचे साहस दाखवले. त्यानंतर त्याच्या शरीराच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र, दुसऱ्या दिवशी मंगळवारी हाच मासा बंदरातील आतील भागात जाळ्यात अडकून सुटकेसाठी धडपडत असल्याचे दिसले. याची माहिती वनविभागाला समजताच एम. डी. राऊत, एस. के. उतेकर, एस. डी. ठाकरे, बी. पी. राठोड या वनविभाग अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी परत एकदा येथील सर्व मच्छिमारांनी एकत्र येत त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. त्याच्या शरीराभोवती  असणारे जाळे त्याला कुठलीही इजा न करता काढण्यात आले.श्रीवर्धनमधील भरडखोल, आरावी, दिवेआगर या समुद्रकिनाऱ्यावर मागील काळात मृत मासा सापडलेल्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, यावेळी आदगाव येथील किनाऱ्यावर आलेल्या जिवंत शार्क माशांबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कोळी बांधवांमुळे या माशाचे प्राण वाचले.