शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हवाई हल्ला होताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
3
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
4
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
5
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
6
"माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
7
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
8
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
9
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
10
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
11
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
12
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
13
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
14
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
15
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
16
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
17
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
18
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
19
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
20
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 

आदगाव शाळा मंदिरात! सात वर्षांपासून दुरुस्तीची मागणी; प्रशासनाची दिरंगाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 03:12 IST

श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव येथील जिल्हा परिषद शाळा सध्या मंदिरामध्ये भरत आहे. शाळेच्या दुरुस्तीला दिरंगाई होत असल्याने, अजून किती दिवस शाळा मंदिरात भरणार, असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थ करत आहेत.

- गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव येथील जिल्हा परिषद शाळा सध्या मंदिरामध्ये भरत आहे. शाळेच्या दुरुस्तीला दिरंगाई होत असल्याने, अजून किती दिवस शाळा मंदिरात भरणार, असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थ करत आहेत.आदगाव येथील शाळेचे पत्रे व कौलारू छप्पर वादळात उडून मोठे नुकसान झाले आहे. दुपारच्या सुट्टीमुळे शाळेतील विद्यार्थी बालबाल बचावले होते. शाळेला वाळवी लागल्याने ती धोकादायक बनली असून दुरुस्तीची मागणी गेल्या सात वर्षांपासून पालक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मात्र, संबंधित विभागाकडून दुरुस्तीला चालढकल होत असल्याने आदगाव येथील मंदिरात पहिली ते चौथी अशी एकत्र शाळा भरवावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.समुद्रकिनारी वसलेल्या आदगाव येथे इयत्ता चौथीपर्यंतची जिल्हा परिषदची मराठी शाळा आहे. विद्यार्थ्यांची एकूण ७० पटसंख्या असणाऱ्या शाळेला चार खोल्या आहेत. अचानक सुटलेल्या वादळी वाºयाने शाळेच्या चारपैकी तीन खोल्यांचे पत्रे व कौलारू छप्पर उडून मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये डिजिटल रूमची प्लॅस्टिक शेड फाटल्याने डिजिटल शैक्षणिक साहित्यांचे नुकसान झाले आहे. मात्र, शाळेचे संपूर्ण पत्रे व भिंतीची नासधूस झाल्याने सर्व विद्यार्थ्यांना मंदिरात बसवले जाते. त्यामुळे आता लवकरात लवकर शाळेची दुरुस्ती कशी होईल, असा प्रश्न शिक्षक व पालकांपुढे आहे.वाळवी लागल्याने आदगाव शाळा धोकादायक बनली व छप्परामधील पूर्ण लाकूड वाळविणे बाधित आहे. त्यामुळे पावसाळी शाळा कायम गळकी असते. सातत्याने पाण्याने वर्ग व येथील डिजिटल शैक्षणिक साहित्याचे नुकसान होत आहे. त्यामुळे संपूर्ण शाळा केव्हाही कोसळण्याची भीती कायम आहे. आदगाव शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी शिक्षण विभागाकडे शाळा कमिटी २०१३ पासून मागणी करत असताना मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून आजतागायत दुरुस्ती झाली नाही, त्यामुळे अजून किती दिवस शाळा मंदिरातच भरणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत.पहिली ते चौथीची शाळा एकत्रच!सध्या सणासुदीचे दिवस आहेत. गावदेवी मंदिरामध्ये विविध कार्यक्रम होत असतात. यामध्ये एकत्रित पहिली ते चौथी वर्गातील ७० विद्यार्थ्यांना कसे शिकवायचे, या विवंचनेत शिक्षक आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळेबाबत समस्या दूर कराव्यात, अशी मागणी उपसरपंच देवेंद्र मोरे यांच्यासह ग्रामस्थांकडून होत आहे.शिक्षण विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही शाळा दुरुस्तीसाठी कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. अशा समस्यांमुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय. ज्या शाळा स्पर्धेच्या युगामध्ये टिकत आहेत, अशा शाळांकडे दुर्लक्ष करणे फार मोठी चिंतेची बाब आहे.- सुदेश मोरे, माजी व्यवस्थापक, शाळा समिती, अध्यक्ष, आदगावआदगाव शाळेच्या दुरुस्ती प्रस्तावानुसार मंजुरी मिळाली आहे. मात्र, अद्याप निधी वर्ग झाला नाही. निधी वर्ग झाला की लवकरात लवकर दुरुस्तीचे काम करण्यात येईल.- नूरमहमद राऊत, गटशिक्षण अधिकारी, श्रीवर्धन

टॅग्स :SchoolशाळाRaigadरायगड