शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अनंत गीतेंच्या ‘सिंहावलोकन’वर कारवाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 06:21 IST

शिवसेना-भाजपा युतीचे रायगड लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार अनंत गीते यांची ‘सिंहावलोकन’ ही प्रचार पुस्तिका वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

अलिबाग : शिवसेना-भाजपा युतीचे रायगड लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार अनंत गीते यांची ‘सिंहावलोकन’ ही प्रचार पुस्तिका वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. प्रतींची संख्या आणि मुद्रक, प्रकाशकाचे नाव हा अनिवार्य मजकूर पुस्तिकेतून वगळण्यात आल्याने आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या वकिलांनी केली होती. त्यानुसार, अलिबाग शहर निवडणूक आचारसंहिता देखरेखप्रमुख महेश चौधरी यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार या पुस्तिकेचे मुद्रक व प्रकाशक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता नियम व लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ अन्वये प्रचार पुस्तिकेवर प्रतींचीसंख्या आणि मुद्रकाचे नाव छापणे अनिवार्य आहे. मात्र, गीते यांच्याप्रचार पुस्तिकेत हा मजकूर नछापला गेल्याने, पुस्तिकेचे प्रकाशक अनिरुद्ध गांधी (मालाड, मुंबई)आणि मुद्रक श्री. इंटरप्रायझेस, ५०१, गोरेगाव-पश्चिम यांच्या विरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम१९५१च्या कलम १२७ (क)अन्वयेगुन्हा दाखल करण्यात आला आहे.या पुस्तिकेचा वापर करणारेशिवसेना-भाजप उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गीते मात्र नामानिराळे राहिले आहेत.अनंत गीते यांचे वकील अ‍ॅड. एन. टी. रातवडकर यांनी ‘सिंहावलोकन’ पुस्तिकेच्या छपाईचे बिल निवडणूक अधिकाऱ्यांसमोर सादर केले. ही पुस्तिका प्रचार साहित्य म्हणून सक्षम अधिकाºयाकडून परवानगी न घेता वितरित झाले, तसेच त्यावर मुद्रक आणि प्रकाशकाचे नाव नसल्याने आचारसंहितेचा भंग झाल्याचानिष्कर्ष काढण्यात आला. त्यामुळे ही पुस्तिका छापून घेणारे प्रकाशकअनिरुद्ध गांधी आणि मुद्रक श्री इंटरप्रायझेस यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे कलम १२७ (क) अन्वये पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे आदेश अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांनी दिले. त्यानुसार, अलिबाग शहर निवडणूक आचारसंहिता देखरेखप्रमुख व अलिबाग नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश चौधरी यांनी अलिबागपोलीस ठाण्यात दाखल फिर्याद दाखल केली. त्यानंतर, पुस्तिकेचे मुद्रक व प्रकाशक यांच्याविरुद्धगुन्हा दाखल करण्यात आला.>तटकरेंच्या वकिलाने केली तक्रारकाँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे अधिकृत उमेदवार सुनील तटकरे यांचे वकिल अ‍ॅड. सचिन जोशी यांनी याबाबत रायगड निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.याबाबत अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांनी शिवसेना उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी त्यांना नोटीस बजावली होती.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगडAnant Geeteअनंत गीते